धक्कादायक – सरकारने लपवले ११५०० मृत्यू ? आकडेवारीबाबतच्या भाजप प्रवक्त्यांच्या ट्विटने उडाली खळबळ

उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) सरकार फक्त पीआर करून बेस्ट मुख्यमंत्र्यांचे गोडवे गात आहे. मात्र, आकडेवारी कमी दाखवून आणि लपवून सत्य लपणार नाही, असे केशव उपाध्ये(Keshav Upadhye) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

  मुंबई : भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये(Keshav Upadhye) यांनी ट्विट करत राज्य सरकारला टार्गेट केले आहे.

  “१ लाख कोविड बाधितांच्या मृत्यू झाल्याने महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर तर जगात १०व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यात आता ११,५०० मृत्यू लपवल्याची (11500 Deaths Hidden By State Government माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) सरकार फक्त पीआर करून बेस्ट मुख्यमंत्र्यांचे गोडवे गात आहे. मात्र, आकडेवारी कमी दाखवून आणि लपवून सत्य लपणार नाही.” असे केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

  येत्या दोन दिवसांत नोंद करण्याचा आदेश
  कोरोनाने आतापर्यंत महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक जणांचे मृत्यू झाले असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात ही संख्या त्याहून अधिक असल्याचे बोलण्यात येत आहे. यावरून भाजपने टिका केली आहे. मृतांच्या संख्येची माहिती देणाऱ्या पोर्टलवर अतिरिक्त ११ हजार ६१७ मृत्यूंची नोंद झालेली नसून, ती येत्या दोन दिवसांत करण्याचा आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने दिला आहे.

  ११ हजार ६१७ मृत्यूची पोर्टलवर नोंदच नाही
  १८ सप्टेंबर २०२० ते २० मे २०२१ या काळात जिल्ह्यांच्या आरोग्य यंत्रणेने राज्याच्या आरोग्य खात्याला पाठविलेल्या अहवालात नोंदविलेले मृत्यू आणि राज्याच्या आरोग्य खात्याने दाखविलेल्या मृतांच्या संख्येत तफावत असल्याचे या माहितीतून समोर आले आहे. विविध जिल्ह्यांतील एकूण मृतांच्या संख्येपेक्षा कमी संख्या राज्याच्या दैनंदिन अहवालात दाखविण्यात आल्याचे दिसते. १८ सप्टेंबर ते २० मे या काळात राज्यात ११ हजार ६१७ रुग्णांचा करोनामुळे झालेल्या मृत्यूची नोंद अद्याप पोर्टलवर झालेली नाही.

  नोंद नसलेल्या मृत्यूची विभागवार संख्या – मुंबई १६०४, नाशिक ४२७, पुणे ५७६८, कोल्हापूर ४१, औरंगाबाद १०८६, लातूर ८१, अकोला ८३५, नागपूर १८९३ राज्यांतील अन्य मृत्यू ११८, एकूण ११,६१७

  पुणे विभाग – पुणे जिल्हा ५०२९, सातारा जिल्हा ६६२, सोलापूर जिल्हा ७७