चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; निधी चौधरी यांची दोन दिवसांत दुसऱ्यांदा बदली

राज्य सरकारने पुन्हा एकदा ४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या(Transfer Of 4 IAS Officers) केल्या आहेत.

    मुंबई : राज्य सरकारने (Transfer Of 4 IAS Officers By State Government)रायगडच्या माजी जिल्हाधिकारी निधी चौधरी(Nidhi Chudhary) यांची दोन दिवसांत दुसऱ्यांदा बदली करण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी रायगडमधून(Raigad) चौधरी याना माहिती तंत्रज्ञान विभागात संचालकपदी बदली देण्यात आली होती मात्र आता पुन्हा लगेच त्यांना मुंबई उपनगर जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. सध्या या पदावर जिल्हाधिकारी असणारे मिलींद बोरीकर याची बदली करण्यात आली असून त्यांना पर्यटन विभागात संचालक या पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

    याशिवाय अन्य तीन सनदी अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जयश्री भोज यांना राज्य माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून राज्य पर्यटन विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदलण्यात आले आहे. तर डॉ निरुपमा डांगे याची नियुक्ती नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सन च्या  सहायक निवासी आयुक्त पदी करण्यात आली आहे.