आरोग्य विभागाचा मोठा खुलासा – येेत्या २ आठवड्यांमध्ये राज्यात दिवसाला १००० मृत्यू होणार, आरोग्य यंत्रणा अपुरी पडणार

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची(corona patients in maharashtra) संख्या येत्या दोन आठवड्यांमध्ये वेगाने वाढणार असल्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाने शक्यता वर्तवली आहे की, ४ एप्रिलपर्यंत राज्यातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या तीन लाखांपर्यंत जाऊ शकते. यामध्ये सगळ्यात जास्त रुग्णवाढ पुणे, नागपूर आणि मुंबईमध्ये असेल असेही आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

    आरोग्य विभागाच्या मते, पुण्यामध्ये ६१ हजार १२५, नागपूरमध्ये ४७ हजार ७०७ तसेच मुंबईत ३२ हजार ९२७ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असतील असा अंदाज आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना उपचारासाठी आरोग्य सेवा अपुऱ्या पडतील असंही सांगितलं जात आहे. नागपूर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. तसेच येत्या ११ दिवसांमध्ये ६४ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण आठवड्याला एका टक्क्याने वाढत असल्याचं सर्व जिल्ह्यांमधून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होतं आहे. याच आकडेवारीच्या आधारे राज्याच्या आरोग्य विभागाने हा अंदाज व्यक्त केलाय. या माहितीच्या आधारे मृत्यू दर हा २.२७ टक्के असल्याचं सांगण्यात आलं आहे. याच दराच्या आधारे पुढील दोन आठवड्यांमध्ये राज्यामधील एकूण करोना रुग्णांची संख्या २८ लाख २४ हजार ३८२ इतकी होईल आणि मृतांचा आकडा हा ६४ हजार ६१३ पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. म्हणजेच महाराष्ट्रात पुढील दोन आठवड्यांमध्ये करोनामुळे दिवसाला एक हजार जणांचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

    राज्यामध्ये बेड्सची संख्या, आयसीयू बेड्स आणि व्हेटिंलेटर्सची संख्या पुरेशी असली तरी ऑक्सिजन सेवा असणाऱ्या बेड्सची संख्या चार हजारांनी वाढवण्याची गरज आरोग्य विभागाने व्यक्त केलीय. पुढील काही दिवसांमध्ये ठाणे आणि नागपूर या दोन जिल्ह्यांमधील बेडची संख्या वाढवली नाही तर परिस्थिती गंभीर होईल अशी भीती राज्यातील आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी व्यक्त केली आहे.