सलून व्यवसाय सुरू करण्याबाबत १८ जूनला राज्यव्यापी जेलभरो आंदोलनाचा इशारा

जगभरासह संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहेत. त्यामुळे या भीषण संकटाला आळा घालण्यासाठी, महाराष्ट्र राज्य सरकारने काही व्यवसायांसोबतच सलून व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु आता जवळपास

जगभरासह संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहेत. त्यामुळे या भीषण संकटाला आळा घालण्यासाठी, महाराष्ट्र राज्य सरकारने काही व्यवसायांसोबतच सलून व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु आता जवळपास ७० ते ८० टक्के दुकाने ही भाडेतत्वावर आहेत. तसेच राज्यातील सुमारे २५ लाखांपेक्षा अधिक व्यक्तिंच्या कुटुंबियांचा उदारनिर्वाहतेचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे सलून व्यवसाय सुरू करण्यास बुधवारी होणाऱ्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला गेला नाही तर येत्या १८ जूनला राष्ट्रीय नाभिक महासंघ, महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशन व सलून व्यावसायाशी संबधित अनेक संस्था व संघटनांचे पदाधिकारी राज्यव्यापी जेलभरो आंदोन करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विजय पंडीत यांनी दिला आहे.     

दोन महीन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सुरूवात झाली. सलून व्यवसाय सुरू करण्याबाबत नियमानुसार परवानगी द्यावी. तसेच भरीव मदतीचे पॅकेज जाहीर करून सहाय्य करावे आणि सरकारकडून आरोग्य विमा करण्यात यावा, अशी मागणीही असोसिएशनने केली आहे. या सर्व मागण्यांबाबत बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.