राज्यात अजून १० दिवस कडक निर्बंध वाढण्याची शक्यता ; आज च्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय

आणखी दहा दिवस लॉकडाऊन वाढवावा, असे अनेक मंत्र्यांचे म्हणणे आहे. त्यांनी अशी मागणी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली. त्यामुळे आज बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी शिक्कामोर्तब केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

    मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर ठाकरे सरकारने तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन राज्यभर कडक निर्बंध लागू केले. या कडक निर्बंधामुळे मागील काही दिवसांत रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आणखी दहा दिवस लॉकडाऊन वाढवावा, असे अनेक मंत्र्यांचे म्हणणे आहे. त्यांनी अशी मागणी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली. त्यामुळे आज बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी शिक्कामोर्तब केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. तसेच सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पुन्हा तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत, त्यामुळे आपल्याला पूर्ण तयारी करून घ्यावीच लागेल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे म्हणणे आहे.

    केंद्र सरकारकडून ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि अन्य गोष्टी रोज किती मिळतात? याची अधिकृत माहिती सरकारच्या वतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला. याचे अधिकृत प्रसिद्धिपत्रक काढून सगळ्यांना देण्याचा निर्णय मंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पारदर्शकपणे सत्य माहिती जनतेपुढे येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि उदय सामंत यांनी लॉकडाऊन वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

    २६ एप्रिलच्या नियोजनानुसार खासगी रुग्णालयांसाठी २७ हजार तर सरकारी रुग्णालयांसाठी महाराष्ट्रात १८ वर्षांच्या पुढील लोकांना कोरोनाची लस मोफत द्यायची की नाही, याचा निर्णय बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल. तसेच १ मेनंतर लॉकडाऊन किती दिवस चालू ठेवायचा, यावरचादेखील निर्णय मंत्रिमंडळात घेतला जाईल.

    - अजित पवार,उपमुख्यमंत्री