दहावी फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशाची संधी, आजपासून अर्ज करता येणार, असा करा अर्ज

दहावी फेरपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार संचालनालयाने आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

मुंबई: राज्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेचा ( SSC examination result) निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये ( ITI entrance )प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शुक्रवार (१ जानेवारी) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज ( online application) करता येईल. तर ५ जानेवारीला प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.


व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा आयटीआय प्रवेशाला विद्यार्थ्यांकडून कमी प्रतिसाद मिळाला आहे. कोरोनामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली आहे. दहावी फेरपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार संचालनालयाने आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांना ४ जानेवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रवेशाची गुणवत्ता यादी ५ जानेवारीला यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशाविषयी विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळविण्यात येईल, असे संचालनालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवेशाचे वेळापत्रक ऑनलाईन प्रवेशअर्ज भरणे - १ ते ४ जानेवारी गुणवत्ता यादी जाहीर - ५ जानेवारी, सायंकाळी ५वाजता संस्थास्तरीय समुपदेशन फेरी - २ जानेवारी, सायंकाळी ५ वाजता खाजगी संस्थास्तरावरील प्रवेश - ८ ते १५ जानेवारी