अल्पबचत व्याजदर – मोदी सरकारच्या यू टर्ननंतर सुप्रिया सुळेंनी सरकारकडे केली ही मागणी

अर्थ मंत्रालयाकडून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील अर्थात पीपीएफसह अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा आदेश बुधवारी काढण्यात आला होता. हा निर्णय काही तासांनी मागे घेण्यात आला. सरकारच्या निर्णय मागे घेण्याच्या भूमिकेचं खासदार सुप्रिया सुळे(supriya sule) यांनी स्वागत केलं आहे.

    अल्पबचत योजनांवरील व्याजदराच्या निर्णयात बदल केल्यानंतर मोदी सरकारवर प्रचंड टीका करण्यात आली. विरोधकांनी सरकारच्या यू-टर्नच्या भूमिकेवर भाष्य केले आहे. सरकारकडूनएवढी मोठी चूक झाल्याने अनेकांनी सरकारला धारेवर धरले आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे(supriya sule) यांनीही टीका करत सरकारचं अभिनंदन केलं आहे.

    अर्थ मंत्रालयाकडून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील अर्थात पीपीएफसह अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा आदेश बुधवारी काढण्यात आला होता. हा निर्णय काही तासांनी मागे घेण्यात आला. सरकारच्या निर्णय मागे घेण्याच्या भूमिकेचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केलं आहे.तसेच पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीबाबतचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.

    सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की,“अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारनं तातडीनं फिरविला. सरकारचं याबद्दल अभिनंदन. यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला. आता केंद्र सरकारनं अशीच तत्परता दाखवत पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढ देखील तात्काळ मागे घ्यावी ही विनंती,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.