पदोन्नतीतील आरक्षणासाठी अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा : ऊर्जामंत्री नितीन राऊत

महाराष्ट्र काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने काल सोमवारी एका बैठकीचे आयोजन केले होते. दूरदृश्य प्रणालीवरही बैठक झाली होती. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी पदोन्नतीतील आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावेळी नितीन राऊत यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केले. ओबीसींच्या प्रश्नांवर मंत्री उपसमिती बनते.

    पदोन्नतीतील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा. मीही या मोर्चात सहभागी होईन, असे आवाहन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेसच्या अनुसूचित जाती, जमाती सेलच्या कार्यकर्त्यांना केले. दलित-मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत काहीच निर्णय घेतला जात नाही.

    महाराष्ट्र काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने काल सोमवारी एका बैठकीचे आयोजन केले होते. दूरदृश्य प्रणालीवरही बैठक झाली होती. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी पदोन्नतीतील आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावेळी नितीन राऊत यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केले. ओबीसींच्या प्रश्नांवर मंत्री उपसमिती बनते.

    त्याच्या अध्यक्षपदी ओबीसी मंत्र्याला नियुक्त केले जाते. मराठा आरक्षण विषयावर उपसमितीच्या अध्यक्षपदी मराठा मंत्र्याची वर्णी लागते. मात्र पदोन्नतीच्या विषयावरील उपसमितीचे अध्यक्ष दलित मागासमधील मंत्र्यास न करता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नेमण्यात आले, असे का? असा सवाल राऊत यांनी विचारला.