‘टास्क फोर्स ऑन आयुष फॉर कोविड १९” समितीने कोरोनासाठी आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथीच्या तयार केल्या मार्गदर्शक सूचना

मुंबई : मुंबई कोरोनाविरोधातील लढ्यात राज्य सरकारकडून अॅलोपॅथीला प्राधान्य देत आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथीकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र आयुष मंत्रालयाने आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथीबाबत

मुंबई : मुंबई कोरोनाविरोधातील लढ्यात राज्य सरकारकडून अॅलोपॅथीला प्राधान्य देत आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथीकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र आयुष मंत्रालयाने आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथीबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे अखेर राज्य सरकारने ‘टास्क फोर्स ऑन आयुष फॉर कोविड १९’ ची स्थापना केली. या समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने कोविडसाठी तिन्ही पॅथींच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व रोग प्रतिबंधासाठी उपचार, कोविड १९ सारखी लक्षणे असणाऱ्या अन्य आजारांसाठी उपचार, कोविड १९ पॉझिटिव्ह अलाक्षणिक, चिकित्सालयीन तपासणीनुसार स्थिर असणाऱ्या व इतर वर्तमान गंभीर व्याधीरहित रुग्णांसाठी उपचार पद्धतीचा समावेश आहे. 

१) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व रोग प्रतिबंधासाठी उपचार 

आयुर्वेदिक औषधी – संशमनी वटी १ गोळी दिवसांतून दोनदा १५ दिवस, – आयुष क्वाथ – तुळस ४ भाग, सुंठ २ भाग, दालचिनी २ भाग आणि काळीमिरी १ भाग या द्रव्याच्या भरड चूर्णाने फांट तयार करणे (औषधीचे ३ ग्राम भरड चूर्ण १०० मिलीमीटर उकळलेल्या पाण्यात मिसळून ५ ते ७ मिनिटे झाकून ठेवणे व गाळून ते पाणी किंवा फांट पिणे हा फांट सकाळ व सायंकाळी ताजा बनवून १५ दिवसांसाठी सेवन करावा)- च्यवनप्राश १० ग्राम सकाळी सेवन करावे, मधुमेही रुग्णांनी साखरविरहित च्यवनप्राश सेवन करावे. 

 नाका वाटे औषध टाकणे – सकाळ व सायंकाळी दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळतेल किंवा खोबरेल तेल किंवा तूप हे बोटाने लावावे – गुळण्या करणे –

तोंडामध्ये एक मोठा चमचा तिळतेल किंवा खोबरेल तेल घ्यावे. हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात. त्यानंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चुळ भरावी असे दिवसांतून दोनदा करावे. गरम पाण्याने देखील एकदा किंवा दोनदा गुळण्या कराव्यात. 

युनानी औषधी – काढा / जोशंदा – बिहिदाना ५ ग्राम, बर्गे ७ ग्रॅम, उन्नाब ७ दाणे, सपिस्तान ७ दाणे, दालचिनी ३ ग्रॅम, बनपशा ५ ग्रॅम यांचा काढा. या घटकद्रव्यांना २५० मिलीमीटर पाण्यामध्ये १५ मिनिटे उकळवावे व गरम असताना चहाप्रमाणे दिवसातून १ किंवा दोन वेळा सेवन करावे. 

खमीरा मरवारीद – दुधासोबत ५ ग्रॅम दिवसातून दोनदा सेवन करावे (मधुमेही रुग्णांनी सेवन करू नये.) 

होमिओपॅथी औषधी – अर्सेनिक अल्बम ३० – ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा, असे सलग तीन दिवस सेवन करावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करावा. 

२ ) कोविड १९ सारखी लक्षणे असणाऱ्या अन्य आजारांसाठी उपचार

आयुर्वेदिक औषधी  – टॅबलेट आयुष ६४ (५०० मिलिग्रॅम) – दोन गोळ्या दिवसांतून दोन वेळा १५ दिवस सेवन करणे – अगस्त्य हरीतकी – ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस सेवन करणे – तीळतेल – दोन थेंब प्रतिदिन सकाळी प्रत्येक नाकपुडीत टाकणे – ताजी पुदिन्याची पाने किंवा ओवा पाण्यात उकळून त्याची वाफ दिवसातून एकदा किंवा दोनदा घेणे – खोकला व घसा खवखवणे यासाठी नैसर्गिक साखर अथवा मध यामध्ये लवंगचूर्ण मिसळून दिवसातून २ ते ३ वेळा घेणे 

युनानी औषधी – अर्क अजीब – अर्धा ग्लास पाण्यामध्ये ५ थेंब मिसळून गुळण्या कराव्यात हा उपक्रम १५ दिवस करावा. हे मिश्रण घरी देखील ५ ग्रॅम सत्व अजवाईन, सत्व पुदिना व सत्ते कापूर एकत्र करून तयार करता येते. 

होमिओपॅथी औषधी  – अर्सेनिक अल्बम ३० – ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा, असे सलग तीन दिवस सेवन करावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करावा.

 ब्रायोनिया अल्वा, हस टॉक्सिको डेन्ड्रॉन, बेलाडोना जेलसेमियम, युप्याटोरियम परफॉलीऍटम ही औषधे देखील सर्दी, खोकला किंवा ताप सारख्या रोगांमध्ये चिकित्सेसाठी उपयुक्त ठरली आहेत. 

३ ) कोविड १९ पॉझिटिव्ह अलाक्षणिक, चिकित्सालयीन तपासणीनुसार स्थिर असणाऱ्या व इतर वर्तमान गंभीर व्याधीरहित रुग्णांसाठी उपचार 

आयुर्वेदिक औषधी  – टॅबलेट आयुष ६४ (५०० मिलिग्रॅम) – दोन गोळ्या दिवसांतून दोन वेळा १५ दिवस सेवन करणे – टॅबलेट सुदर्शन घनवटी (२५० मिलिग्रॅम) – दोन गोळ्या दिवसांतून दोन वेळा १५ दिवस सेवन करणे  

अगस्त्य हरीतकी – ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस सेवन करणे सोपे .आयुर्वेद चिकित्सा उपक्रम – नाका वाटे औषध टाकणे – सकाळ व सायंकाळी दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळतेल किंवा खोबरेल तेल किंवा तूप हे बोटाने लावावे – गुळण्या करणे – तोंडामध्ये एक मोठा चमचा तिळतेल किंवा खोबरेल तेल घ्यावे. हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात. त्यानंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चुळ भरावी असे दिवसांतून दोनदा करावे. गरम पाण्याने देखील एकदा किंवा दोनदा गुळण्या कराव्यात. – गरम पाण्याची वाफ दिवसातून दोनदा किना तीनदा घ्यावी 

होमिओपॅथी औषधी  कोविड १९ सामान रोगाच्या लक्षणांच्या चिकित्सेकरिता उपरोक्त नमूद औषधांचा वापर हा प्रस्थापित चिकित्सेस पूरक चिकित्सा म्हणून केला जाऊ शकतो.