केवळ दहावीच्या शिक्षकांनाच राज्य सरकारकडून रेल्वे प्रवासाची परवानगी,शिक्षक संघटना झाल्या आक्रमक – केल्या ‘या’ मागण्या

लोकल प्रवासात(Local Travel) दहावी सोडून इतर शिक्षक, मुख्याध्यापक, इतर विषय शिक्षक(Train Travel Permission To Teachers) आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना वगळण्यात आलेले आहे. दहावीच्या शिक्षकांची माहिती घेऊन त्यांनाच केवळ ट्रेनने प्रवास करण्याचा पास देण्याचा सरकारचा विचार केला आहे.

  मुंबई : राज्य सरकारने केवळ दहावीच्या शिक्षकांनाचा लोकल प्रवासाची परवानगी (Tenth Class Teacher Can Travel From Train) दिली आहे. त्यामुळे शाळेतील अन्य शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीबाबत सरकारने दिलेले आदेश हे गैरलागू आहेत. हा निर्णय तातडीने मागे घेऊन शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच रेल्वे पास ऑनलाईन एसएमएसद्वारे मिळणार असल्याने ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ आहे. त्यासाठी आणखी आठ दिवस जाणार आहेत. त्यामुळे सरकारने सरसकट परवानगी द्यावी, अशी मागणीही शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.

  लोकल प्रवासात दहावी सोडून इतर शिक्षक, मुख्याध्यापक, इतर विषय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना वगळण्यात आलेले आहे. दहावीच्या शिक्षकांची माहिती घेऊन त्यांनाच केवळ ट्रेनने प्रवास करण्याचा पास देण्याचा सरकारचा विचार केला आहे. त्यामुळे शिक्षक भारतीकडून याचा निषेध करण्यात येत असल्याचे जालिंदर सरोदे यांनी सांगितले.

  दहावीच्या शिक्षकांनाच पास देणार असाल आणि शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीच नसतील तर शाळा उघडणार कोण? याचा साधा विचारही शिक्षण विभागाने केला नसल्याची टीका सरोदे यांनी केली. परिस्थिती पूर्ववत होत नाही तोवर वर्क फ्रॉम होमची परवानगी द्यावी अशी मागणीही शिक्षक भारतीने केली.

  अन्य शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती व दहावी, बारावीच्या शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचार्‍यांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. त्यामुळे लोकल सुविधा सर्वांनाच मिळावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय डावरे यांनी केली.

  शिक्षकांना रेल्वे प्रवासासाठी परवानगीबाबत शिक्षक परिषदेने सतत पाठपुरावा केल्यामुळे दहावीच्या शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतरांना रेल्वे प्रवासासाठी परवानगी दिली पाहिजे. सर्वांना प्रवासाची संधी मिळावी यासाठी लढा कायम ठेवू असे शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी सांगितले.

  लोकलमध्ये दहावीच्या मूल्यमापन करणार्‍या शिक्षक-शिक्षकेतरांना परवानगी दिली असली तरी ही प्रक्रिया किचकट व वेळखाऊ आहे. शिक्षण उपसंचालकांकडून नावे येतील मग रेल्वेपास ऑनलाईन एसएमएसच्या माध्यमातून रेल्वे वितरित करेल. यात अनेक दिवस जातील त्यापेक्षा शाळेच्या ओळ्खपत्रावर पास देण्यात यावा. अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली.