तेजस ठाकरेंचं नवं संशोधन

रानावनात आणि दऱ्याखोऱ्यात फिरून जीवशास्त्रीय संशोधन करणारा संशोधक अशी तेजस ठाकरे यांची ओळख आहे. आपल्या या ओळखीला नवा आयाम देत तेजस यांनी त्यांच्या कारकीर्दीतील चौथ्या प्रजातीचा नुकताच शोध लावलाय.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे यांनी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लावलाय. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये ही चौथी नवी प्रजाती शोधून काढण्यात त्यांना यश मिळालंय.

याबाबत संशोधन करत असताना अंबोली घाटातील हिरण्यकश नदीत त्यांना वेगळ्या प्रकारचे मासे असल्याचं दिसून आलं. सामान्य माशांसारखेच मात्र सोनेरी रंगाचे हे मासे आहेत. या प्रजातीला हिरण्यकेशी असं नाव देण्याचा निर्णय तेजस यांनी घेतला.

 

View this post on Instagram

 

It gives me immense joy in announcing the discovery of this stunning fish – Schistura hiranyakeshi sp. nov. (Hiranyakeshi loach), a jewel from the heart of the Sahyadris in Maharashtra, published in ‘Aqua, International Journal of Ichthyology’! Endemic to its type locality, the ‘kund’ at the ancient Hiranyakeshvar temple, where the mighty Hiranyakeshi river originates. It is near the quaint town of Amboli, a hotspot for new discoveries across multiple taxas, with this fish being the 20th new species (and my 4th) to be described from this tiny town in Sindhudurg district since 2005! We have named this species after it’s type locality and the ephitet “hiranyakeshi” in Sanskrit also means ‘golden hair’ alluding to the brilliant golden colouration seen in adults. Leading the paper is Dr. Praveenraj Jayasimhan, a young and extremely passionate ichthyologist, whom I have been working closely with since the past year, Along with Mr. Shankar Balasubramanian, an explorer & underwater photographer traveling across India documenting our incredible freshwater fish diversity and their shrinking habitats for the past 18 years! I hope you enjoy this stunner & have a good weekend ahead. #westernghats #sahyadris #freshwaterfish #maharashtra #taxonomy #novataxa #ichthyology #loach #schistura #amboli @praveenrajjayasimhan @shankar.balasubramanian

A post shared by Tejas Thackeray (@tuthackeray) on

या माशाची ही विसावी प्रजाती आहे. तर तेजस ठाकरे यांनी शोध लावलेली ही चौथी प्रजाती आहे. माशाच्या प्रजातीचा शोध लावण्यापूर्वी तेजस यांनी पालींबाबत संशोधन केलं होतं. त्यापूर्वी खेकड्यांच्या नव्या प्रजातीदेखील त्यानी शोधल्या होत्या. आंतरराष्ट्रीय मासिकांनी याची नोंद घेतली होती.

हिरण्यकेशी नाव ठेवण्याचं कारण

हिरण्यकश नदीत ही प्रजाती सापडणं, हे यामागचं प्रमुख कारण आहे. शिवाय हिरण्यकेशी या शब्दाचा अर्थ सोनेरी केस असणारा असाही होतो.