१०वीचा निकाल लागला मात्र आता पुढे काय? कधी होणार ११वीच्या प्रवेशासाठी CET Exam? जाणून घ्या

परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. एकूण १०० मार्कांची ही परीक्षा असणार आहे. यात इंग्रजी , गणित , विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी २५ मार्कांचे प्रश्न असणार आहेत. प्रवेश परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.

  मुंबई : दहावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेत दहावीच्या निकालाबाबत सर्व माहिती देण्यात आली. यात अकरावीच्या प्रवेशाबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.

  १०वीचा निकाल लागला मात्र आता पुढे काय? कधी होणार ११वीच्या प्रवेशासाठी CET Exam? जाणून घ्या

  मुंबई : दहावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेत दहावीच्या निकालाबाबत सर्व माहिती देण्यात आली. तसेच यावेळी अकरावीच्या प्रवेशाबाबतही एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.

  ११वीच्या प्रवेशासाठी CET Exam
  अकरावीच्या प्रवेशासाठी CET म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आता राज्याच्या शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाच्या CET परीक्षेबाबतची माहिती देण्यात आली आहे. शिक्षण मंडळाच्या म्हणण्यानुसार, ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी नसून ज्यांना अकरावीत प्रवेश घ्यायचा आहे आणि जे विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छितात अशांसाठी आहे. ही परीक्षा साधारणतः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा त्यानंतर घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

  CET परीक्षेसाठी हा आहे अभ्यासक्रम
  ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी लवकरच पोर्टल खुलं केलं जाणार आहे आणि रजिस्ट्रेशनला) सुरुवात होणार आहे ही परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. एकूण १०० मार्कांची ही परीक्षा असणार आहे. यात इंग्रजी , गणित , विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी २५ मार्कांचे प्रश्न असणार आहेत. प्रवेश परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे.