‘या’ कारणामुळे आमटे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत

प्रकाश बाबा आमटेच्या पत्नी मंदाकिनी आमटे व त्यांचा मुलगा अनिकेत आमटे या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.

चंद्रपूर : आनंदवनावाच्या सीईओ व डॉ. विकास आमटे यांची कन्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. आनंदवनात घडलेल्या या घटनेबाबत समाजात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मृत्यू बाबतच्या अनेक तर्कवितर्कांची चर्चा शांत होतेय ना .. होतेय तोपर्यंत आणखी एका नवीन घटनेने आमटे कुटंबीय चर्चेत आले आहे.

ते म्हणजे प्रकाश बाबा आमटेच्या पत्नी मंदाकिनी आमटे व त्यांचा मुलगा अनिकेत आमटे या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. अनिकेत आमटे आणि मंदाकिनी आमटे आता क्वारंटाईन झाले आहेत. डॉ. शीतल करजगी यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून कुटुंबिये सावरली नसतानाच हा आणखी एक धक्का आमटे कुटुंबियांना बसला आहे.

महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प चालवला जातो. प्रकल्पाचा कारभार प्रकाश बाबा आमटे आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य चालवतात. यामध्ये हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक म्हणून प्रकाश आमटेंचे चिरंजीव अनिकेत आमटे काम पाहतात. परंतु आता ते दोघेही प्रकल्पाच्या कामात काही दिवस लक्ष न घालता आराम करणार आहेत.