पैशांअभावी बाळाचं ऑपरेशन रखडलं, पाय कापायची वेळ आली.. पण देवदूत बनून मदतीस धावला पत्रकार…

मनीषा रोकडे या अंबरनाथच्या सिद्धार्थनगर झोपडपट्टीत राहतात. मनिषानं १५ डिसेंबरला एका गोड मुलाला जन्म दिला. यानंतर सारंकाही आनंदात सुरु असताना १२ दिवसांनी या चिमुकल्याच्या उजव्या पायावर डास चावल्यासारखी गाठ आली. त्यामुळे घरच्यांनी त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल केलं. तिथे उपचार करून आल्यानंतरही पाय काही बरा झाला नाही. अखेरीस एका डॉक्टरांनी बाळाच्या पायाला इन्फेक्शन झाल्याचं सांगत उजवा पाय गुडघ्यापासून पाय कापावा लागेल असं सांगितलं. त्यामुळं बाळ झाल्याच्या आनंदात असतानाच या माऊलीवर मोठा मानसिक आघात झाला.

  अंबरनाथ: अंबरनाथमध्ये एका आई व तिच्या २ महिन्यांच्या मुलीसाठी एक पत्रकार देवाच्या रूपानं धावून आला, आणि या माऊलीच्या अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव वाचला.

  काय घडले?
  मनीषा रोकडे या अंबरनाथच्या सिद्धार्थनगर झोपडपट्टीत राहतात. मनिषानं १५ डिसेंबरला एका गोड मुलाला जन्म दिला. यानंतर सारंकाही आनंदात सुरु असताना १२ दिवसांनी या चिमुकल्याच्या उजव्या पायावर डास चावल्यासारखी गाठ आली. त्यामुळे घरच्यांनी त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल केलं. तिथे उपचार करून आल्यानंतरही पाय काही बरा झाला नाही. अखेरीस एका डॉक्टरांनी बाळाच्या पायाला इन्फेक्शन झाल्याचं सांगत उजवा पाय गुडघ्यापासून पाय कापावा लागेल असं सांगितलं. त्यामुळं बाळ झाल्याच्या आनंदात असतानाच या माऊलीवर मोठा मानसिक आघात झाला.

  शहरातल्या डॉक्टरांनी यासाठी मुंबईच्या वाडिया रुग्णालयात जाण्याचा सल्ला त्यांना दिला. मात्र हातावर पोट असलेल्या मनीषा आणि तिचा पती शंकर यांना खर्चाच्या विवंचनेनं काय करावं हेच सुचेना झालं होतं. त्यातच बाळाच्या पायाचं ऑपरेशन लवकर झालं नाही, तर या इन्फेक्शनमुळे रक्तात संसर्ग होऊन बाळाच्या जीवावर बेतण्याचीही भीती होती. अशावेळी अंबरनाथमधील पत्रकार पंकज पाटील यांना ही गोष्ट समजली आणि ते या चिमुकल्याचा खरे देवदूत बनले.

  पंकज पाटील यांना ही बाब समजताच त्यांनी या बाळाच्या ऑपरेशनची पूर्ण जबाबदारी घेतली. यानंतर शहरातल्या एक दोन डॉक्टरांसह वाडिया आणि केईएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांचाही सल्ला घेतला. मात्र, सगळीकडून बाळाचा पाय कापावा लागेल, हेच उत्तर मिळत होतं. त्यामुळं पंकज पाटील यांनी या बाळाला पुन्हा घरी आणलं. मात्र त्याच्या जीवावर बेतण्याची भीती लक्षात घेऊन नाईलाजास्तव या चिमुकल्याला पुन्हा एकदा वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन केलं आणि सुदैवानं त्याचा पूर्ण पाय न कापता पायाची बोटं कापण्यावरच निभावलं.

  यानंतर काही दिवसांनी तिथेच या बाळाच्या पायावर प्लास्टिक सर्जरी सुद्धा करण्यात आली आणि आता नुकतंच हे बाळ घरी आलंय. आधी वेदनेनं विव्हळणाऱ्या बाळाच्या चेहऱ्यावर आता असलेलं हसू पाहून त्याची आई मनीषा भावूक होते मी जरी या बाळाला जन्म दिला असला, तरी बाळाला दुसरा जन्म देणारे पंकज दादा हे त्याची दुसरी आई असल्याचं मनीषा सांगते. त्यामुळेच या बाळाचं नाव ठेवण्याचाही हक्क तिने पंकज पाटील यांनाच दिला आणि पंकज पाटील यांनी शिवांश असं या बाळाचं नामकरण केलं.