सावित्री नदीच्या पात्रात सापडला हरविलेल्या व्यक्तीचा मृतदेह

  • पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंद

पोलादपूर.    तालुक्यातील ७२ वर्षीय इसम कापडे येथे भाजी आणण्यासाठी गेले ते परत न आल्याने त्याच्या मुलांनी हरविले असल्याची तक्रार पोलादपूर पोलीस ठाण्यात गुरुवारी दाखल करण्यात आली होती. त्या वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह रविवारी दुपारी ३ च्या सुमारास रान बाजीरे जवळ सावित्री नदी पात्रात रेडे खातर या ठिकाणी सापडला असल्याची माहिती पोलादपूर पोलिसांनी दिली.
या बाबत मिळालेल्या माहिती नुसार गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास मिसिग इसम केशव रघुनाथ पंडित (वय-७२ रा.सोनार वाडी केवनाळे) हे सकाळी गुरुवारी १० वाजता घरातील मंडळींना लोकांचे गणपती चे डेकोरेशन झाले आपले आज का झाले नाही असे बोलले या नंतर चहा नाश्ता करून कापडे येथे भाजी आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले ते परतले नसल्याची तक्रार मुलगा पंढरीनाथ केशव पंडित यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात दिली होती.

पोलादपूर येथील घागरकोंड येथील झुळतापुल परिसरात काहीतरी गडबड झाली असल्याची माहिती पोलादपूर पोलिसांना मिळताच गुरुवारी 5 वाजता घटनास्थळी जात शोध कार्य राबविण्यात आले. या ठिकाणी पाण्याला फ्लो जास्त असल्याने मयत केशव यांनी जीव दिला असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती रविवारी दुपारी ३ च्या सुमारास सावित्री नदी च्या पात्रात पोलादपूर आयटीआय च्या समोरील नदीच्या पलीकडे बाजूस रेडे खातर या जागेत आढळून आला या घटनेची माहिती मिळतात दोरी च्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.