जनगणना जातनिहाय व्हावी ; रामदास आठवले यांचे मत

राज्य सरकारवर टिका करताना आठवले यांनी या सरकारमध्ये ताळमेळ नसल्याचे सांगितले. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले हे राेज वेगवेगळी विधाने करीत आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक झाली तर महािवकास आघाडीच्या आमदारांची मते फुटतील, अशी भिती असल्यानेच ती पुढे ढकलली जात आहे.

    प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी देशाची २०२१ सालची जनगणना ही जातनिहाय झाली पाहीजे. त्यामुळे प्रत्येक समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात न्याय देता येईल, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. िशवसेनेेने राजकीय नुकसान टाळण्यासाठी भाजपसाेबत यावे, अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.

    मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षणाच्या विषयाच्या संदर्भात बाेलताना आठवले यांनी देशातील क्षत्रिय समाजाला केंद्रातील विविध याेजनात आरक्षण मिळावे, अशी मागणी यापूर्वी केल्याचे नमूद केले. आरक्षणासाठी जातनिहाय जनगणना हाेणे गरजेचे आहे. अशी जणनगणना झाल्याने जातीयवाद वाढणार नाही, असे मला वाटते. जातनिहाय जनगणना झाल्यानंतर प्रत्येक समाजाला न्याय देता येईल. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षणाचा अधिकार राज्य सरकारांना देण्याचा ठराव करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याकडे केल्याचे आठवले यांनी सांगितले.

    राज्य सरकारमध्ये ताळमेळ नाही
    राज्य सरकारवर टिका करताना आठवले यांनी या सरकारमध्ये ताळमेळ नसल्याचे सांगितले. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले हे राेज वेगवेगळी विधाने करीत आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक झाली तर महािवकास आघाडीच्या आमदारांची मते फुटतील, अशी भिती असल्यानेच ती पुढे ढकलली जात आहे. शिवसेनेने देखील राजकीय नुकसान टाळण्यासाठी पुन्हा भाजपसाेबत यावे. अजूनही वेळ गेलेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी भाजपबराेबर यावे, असे मत त्यांनी मांडले.

    आणखी काय म्हणाले आठवले ?
    * आगामी निवडणुका भाजपसाेबत आणि त्यांच्याच चीन्हावर लढविणार
    * पक्षाला चिन्ह मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु
    * राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बळीचा बकरा हाेईल
    * एल्गार परीषद आणि भीमा काेरेगावची घटना यात संबंध नाही