Maharashtra Zilla Parishad 2021 Election | जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निकालांमध्ये महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये चुरस | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेटOctober, 06 2021

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निकालांमध्ये महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये चुरस

द्वारा- Navarashtra News Network
13:18 PMOct 06, 2021

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व म्हणजे ११  जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भाजपला झटका बसला आहे कारण त्यांच्या जागा तीनने कमी झाल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसच्या जागेत एक-एकने वाढ झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही एक जागा जिंकली आहे. 

13:12 PMOct 06, 2021

वाशिम जिल्हा परिषद

वंचितच्या सुभाष राठोड यांच्याकडून फेर मतमोजणीची मागणी, राष्ट्रवादीच्या विजयावर आक्षेप

12:52 PMOct 06, 2021

मिटकरींच्या गावात राष्ट्रवादीचा पराभव, बच्चू कडूंच्या प्रहारचा दिमाखात विजय

12:52 PMOct 06, 2021

अकोल्यातील सर्व जागांचे निकाल हाती, वंचितची सत्ता अबाधित

12:34 PMOct 06, 2021

शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित यांचा पराभव

11:46 AMOct 06, 2021

नगरखेडा पंचायत समिती भाजपच्या ताब्यात, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का

11:12 AMOct 06, 2021

मंत्री के सी पाडवी यांची बहीण गीता पाडवी खापर गटातून विजयी

11:11 AMOct 06, 2021

धुळे

धुळ्यातल्या शिरपूरचे ६ गण भाजपाच्या ताब्यात, अमरिष पटेलांचं वर्चस्व कायम

11:04 AMOct 06, 2021

नागपूर-उमरेड पंचायत समिती

भाजपच्या मिनाक्षी कावटे विजयी

11:02 AMOct 06, 2021

नंदुरबार

भाजपच्या सुप्रिया गावित विजयी

Load More
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांतील ८४ सदस्य तर त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांतील १४१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी ६२६ केंद्रांवर मतदान पार पडले आहे. त्यानंतर आज सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच प्रमुख पक्षांच्या दिग्गजांनी प्रचारासाठी दौऱ्याचे आयोजन केले होते.
या पोटनिवडणुकीत वणई (डहाणू), नंडोरा- देवाखोप (पालघर) व गारगाव (वाडा) या जागा महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या असल्यामुळे चुरस वाढली आहे. त्यामुळे त्या प्रतिष्ठेचा झाल्या आहेत. भाजपातर्फे सर्व जागांवर उमेदवार रिंगणात आहेत. या पोटनिवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या १५ जागांसाठी ७४ व चार तालुक्यातील पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ७० उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात निवडणुकीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतदान शांतपणे पार पाडण्यासाठी दक्षता घेण्यात आली.
Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२२ शुक्रवार
शुक्रवार, ऑक्टोबर २२, २०२१

लखीमपूर खेरी प्रकरणी महाराष्ट्र बंदला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, बंद १०० टक्के यशस्वी झाल्याचा खा. संजय राऊत यांचा दावा योग्य आहे असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.