राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

कोरोनाचे रुग्ण वाढत असतली. कंटेनमेंट झोन होणार असतील. तर जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख आहेत. त्यांना जिल्ह्याची परिस्थिती माहिती असते. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असेल किंवा त्याचा फटका विद्यार्थी व शिक्षकांना बसणार असेल, तर कुलगुरुंनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि महाविद्यालयं सुरू ठेवण्याचा निर्णय दोघांनी घ्यावा

    राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाविद्यालयांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. महाविद्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय कुलगुरू आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करून घ्यावा. तसे निर्देश देण्यात आले असल्याची महत्वाची माहिती सामंत यांनी आज दिली. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादसह प्रमुख शहरांत कोरोना बळावू लागला आहे या पार्श्वभूमीवर हा निर्णय सामंत यांनी घेतला आहे.

    “कोरोनाचे रुग्ण वाढत असतली. कंटेनमेंट झोन होणार असतील. तर जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख आहेत. त्यांना जिल्ह्याची परिस्थिती माहिती असते. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असेल किंवा त्याचा फटका विद्यार्थी व शिक्षकांना बसणार असेल, तर कुलगुरुंनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि महाविद्यालयं सुरू ठेवण्याचा निर्णय दोघांनी घ्यावा,” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.