कापूस उत्पादकांचा कापूस शासन खरेदी करणार – अजित पवार

मंत्रिमंडळ बैठकीत कापूस खरेदीसंदर्भात चर्चा करण्यात आली यासंदर्भात पणनविभाग, सीसीआय सह सर्व संबंधितांची बैठक घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले ते म्हणाले की, सीसीआयने

मंत्रिमंडळ बैठकीत कापूस खरेदीसंदर्भात चर्चा करण्यात आली यासंदर्भात पणनविभाग, सीसीआय सह सर्व संबंधितांची बैठक घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले ते म्हणाले की, सीसीआयने सप्टेंबरपर्यंत कापूस खरेदीची तयारी दर्शविली होती परंतू पावसामुळे ही खरेदी तत्काळ झाली पाहिजे ही राज्य शासनाची भूमिका त्यांना सांगण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस शासन खरेदी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  मका, तूर, चणाडाळ, धान याची खरेदी अन्न नागरी पुरवठा व पणन विभागाकडून करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळेल हेही त्यांनी स्पष्ट केले. 

पुरग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सुचना  कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षी पुराने नुकसान झालेल्या पुरग्रस्तांचे पैसे तातडीने देण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. मदत पुनर्वसन विभाग यासंदर्भातील प्रस्ताव पाठवत असल्याचे ते म्हणाले.  कोकणवासियांना पंतप्रधान आवास योजना, गृहनिर्माण विभाग यांच्या मार्फत पक्की स्लॅबची घरे बांधण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

निसर्गवादळामुळे अडचणीत आलेल्या आदिवासी बांधवांना खावटी कर्जापेक्षा खावटी अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना तातडीची मदत म्हणून वीज पुरवठा सुरळित होईपर्यंत प्रति रेशनकार्ड ५ लिटर रॉकेल मोफत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली.  याशिवाय त्यांना रेशनदुकानातून तांदुळ तसेच इतर धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.