राज्यातील रुग्णांच्या संख्येत वाढ;  दिवसभरात ४६६ नवीन रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

मुंबई :रविवारी राज्यातील सर्वाधिक 552 रुग्ण सापडल्यानंतर सोमवारीही रुग्णांची संख्या ही जास्त होती. सोमवारी राज्यात तब्बल 466 नव्या रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या

मुंबई :रविवारी राज्यातील सर्वाधिक 552 रुग्ण सापडल्यानंतर सोमवारीही रुग्णांची संख्या ही जास्त होती. सोमवारी राज्यात तब्बल 466 नव्या रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४६६६ झाली. तर 9 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यातून ५७२ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. 

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी राज्यात 466 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असताना त्यामध्ये मुंबईतील रुग्णांचा आकडा 308 इतका आहे. यामध्ये सोमवारी मुंबईतील 50 पेक्षा अधिक पत्रकार, फोटोग्राफर यांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी मुंबईत 135 कोरोनाचे रुग्ण सापडले असताना सोमवारी हा आकडा थेट 300 वर पोचल्याने मुंबईसाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. 

राज्यात सोमवारी 9 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृतांचा आकडा 232 वर पोचला आहे. मृतांमध्ये मुंबईतील ७ आणि मालेगावमधील २ रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींपैकी ६ पुरुष तर ३ महिला आहेत. सोमवारी झालेल्या ९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत तर १ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मालेगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या २ रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६,०९२ नमुन्यांपैकी ७१,६११ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४६६६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील २३३६ रुग्णांचे विश्लेषण केले असता त्यापैकी १८९० ( ८१%) रुग्ण हे लक्षणविरहित आहेत तर ३९३ रुग्णांना ( १७ %) रुग्णांना लक्षणे होती. या रुग्णांपैकी ५३ रुग्ण ( २ %) हे अतिदक्षता विभागात भरती आहेत. सध्या राज्यात ९३,६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६,८७९. लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे – 

 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू 

१ मुंबई महानगरपालिका ३०३२ १३९ 

२ ठाणे २० २ 

३ ठाणे मनपा १३४     २ 

४ नवी मुंबई मनपा ८३    ३ 

५ कल्याण डोंबवली मनपा ८४ २ 

६ उल्हासनगर मनपा १    ० 

७ भिवंडी निजामपूर मनपा ३ ० 

८ मीरा भाईंदर मनपा ७८ २ 

९ पालघर १७ १ 

१० वसई विरार मनपा १०७ ३ 

११ रायगड १५ ० 

१२ पनवेल मनपा ३३ १ 

ठाणे मंडळ एकूण ३६०७ १५५ 

१३ नाशिक ४ ० 

१४ नाशिक मनपा ६ ० 

१५ मालेगाव मनपा ८५ ८ 

१६ अहमदनगर २१ २ 

१७ अहमदनगर मनपा ८ ० 

१८ धुळे १ १ 

१९ धुळे मनपा ० ० 

२० जळगाव १ ० 

२१ जळगाव मनपा २ १ 

२२ नंदूरबार १ ० 

नाशिक मंडळ एकूण १२९ १२ 

२३ पुणे १८ १ 

२४ पुणे मनपा ५९४ ४९ 

२५ पिंपरी चिंचवड मनपा ५१ १ 

२६ सोलापूर ० ० 

२७ सोलापूर मनपा २१ २ 

२८ सातारा १३ २ 

पुणे मंडळ एकूण ६९७ ५५ 

२९ कोल्हापूर ५ ० 

३० कोल्हापूर मनपा ३ ० 

३१ सांगली २६ ० 

३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १ ० 

३३ सिंधुदुर्ग १ ० 

३४ रत्नागिरी ७ १ 

कोल्हापूर मंडळ एकूण ४३ १ 

३५ औरंगाबाद १ ० 

३६ औरंगाबाद मनपा २९ ३ 

३७ जालना १ ० 

३८ हिंगोली १ ० 

३९ परभणी ० ० 

४० परभणी मनपा १ ० 

औरंगाबाद मंडळ एकूण ३३ ३ 

४१ लातूर ८ ० 

४२ लातूर मनपा ० ० 

४३ उस्मानाबाद ३ ० 

४४ बीड १ ० 

४५ नांदेड ० ० 

४६ नांदेड मनपा ० ० 

लातूर मंडळ एकूण १२ ० 

४७ अकोला ७ १ 

४८ अकोला मनपा ९ ० 

४९ अमरावती ० ० 

५० अमरावती मनपा ६ १ 

५१ यवतमाळ १५ ० 

५२ बुलढाणा २१ १ 

५३ वाशिम १ ० 

अकोला मंडळ एकूण ५९ ३ 

५४ नागपूर ३ ० 

५५ नागपूर मनपा ६७ १ 

५६ वर्धा ० ० 

५७ भंडारा ० ० 

५८ गोंदिया १ ० 

५९ चंद्रपूर ० ० 

६० चंद्रपूर मनपा २ ० 

६१ गडचिरोली ० ० 

नागपूर एकूण ७३ १ 

इतर राज्ये १३ २ 

एकूण ४६६६ २३२