राज्यपालांच्या ‘त्या’ टिप्पणीवर बुद्धिवंतांनी केली टीका, म्हणाले…

राज्यातील मंदिरं खुली (Temple Reopene0 करण्यासाठी काल मंगळवारी भाजपकडून राज्यभर आंदोलन (Agitation) करण्यात आलं होतं. यामध्ये राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र (Letter) लिहिलं होतं. या पत्रामध्ये धर्मनिरपेक्षता याबद्दल केलेल्या टिप्पणीवर हा संकेत असल्याची प्रतिक्रिया बुद्धिवंतांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यपालांच्या टिप्पणीवर संकेत भंग आणि राजकीय आगाऊपणा असल्याची कडक शब्दांत टीका ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांनी केली. कोणतेही संकेत पाळायचे नाहीत. कोणत्याही पदाची प्रतिष्ठा ठेवायची नाही, अशा पद्धतीने सगळे चालले आहे. राज्यपालांकडे लोक तक्रार करतात. त्यावर रीतसर टिप्पणी लिहून ती सरकारकडे पाठविणे अशी पद्धत असते. पण त्यांनी हा सगळा जो दीडशहाणपणा केला आहे, त्याला संकेतभंग आणि राजकीय आगाऊपणा याखेरीज दुसरे काही शब्द नाहीत.

राज्यशास्त्राचे प्राध्यापक व राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार यांनी राज्यपाल हे देवेंद्र फडणवीस यांची राजकीय भूमिका पार पाडत आहेत, असे म्हटले आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे बदललेले आहेत हेही राज्यपाल लोकांच्या नजरेस आणून देताहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. विशेषत: कोरोना साथरोगाच्या काळात गेल्या सहा-सात महिन्यांत उद्धव ठाकरे बदलले आहेत ही वस्तुस्थिती आहे. ते जरा आता विवेकी विचार करत आहेत. भाजपचे राजकारण आतापर्यंत देवेंद्र फडणवीस करत होते, परंतु ते बिहारला गेल्यामुळे जणू काही त्यांचीच भूमिका राज्यपाल पार पाडत आहेत, असे चित्र तयार झाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.