राज्यातील कोरोना रुग्णांनी ओलांडला लाखाचा आकडा

राज्यात ३४९३ नवे रुग्ण, १२७ जणांचा मृत्यू मुंबई :राज्यात शुक्रवारी ३४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १,०१,१४१ झाली आहे. कोरोना रुग्णानी

राज्यात ३४९३ नवे रुग्ण, १२७ जणांचा मृत्यू 

मुंबई  : राज्यात शुक्रवारी ३४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १,०१,१४१ झाली आहे. कोरोना रुग्णानी ओलांडलेला लाखांचा आकडा हा राज्य सरकारने चिंता व्यक्त केली जात आहे.तसेच १२७ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूंची संख्या ३७१७ वर पोहोचली आहे. राज्यात १७१८ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याने आजपर्यंत ४७,७९६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. 

राज्यात १२७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू झाला असून मुंबई ९०, ठाणे ११, कल्याण डोंबिवली ३ वसई विरार १, मीरा भाईंदर १, नाशिक २, धुळे १, पुणे १२, सांगली ३, औरंगाबाद २, अमरावती १ असे मृत्यू झाले आहेत. मृत्यूंपैकी ९२ पुरुष तर ३५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६७ रुग्ण आहेत तर ५२ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या १२७ रुग्णांपैकी ८९ जणांमध्ये ( ७० %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृत्यूपैकी ५० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २० मे ते ९ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५५, ठाणे १०, सांगली ३, कल्याण डोंबिवली २,पुणे २, मीरा भाईंदर  १, वसई विरार  १, नाशिक १, धुळे १आणि अमरावती १ मृत्यू असे आहेत.

राज्यात सध्या ५३ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९५ प्रयोगशाळा कोविड १९ निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६,२४,९७७ नमुन्यांपैकी १,०१,१४१ नमुने पॉझिटिव्ह (१६.१८ टक्के ) आले आहेत. सध्या राज्यात ५,७९,५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५५३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५,०६७ खाटा उपलब्ध असून सध्या २८,२०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.