राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली;  रविवारी तब्बल ३००७ नवे रुग्ण

-कोरोनाबाधित मृतांची संख्या ३०६० वर मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना रविवारी अचानक तब्बल ३००७ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची

-कोरोनाबाधित मृतांची संख्या ३०६० वर 

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना रविवारी अचानक तब्बल ३००७ नवे रुग्ण सापडले  आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८५ हजार ९७५ वर पोहोचली आली आहे.त्याचप्रमाणे ९१ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३०६० झाली आहे. 

राज्यातील मृत्यू दर ३.५५ टक्क्यांवर आला आहे. रविवारी राज्यातील १९२४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून आजपर्यंत ३९ हजार ३१४ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४५.७२ टक्के एवढे आहे.  

राज्यात रविवारी ९१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यामध्ये मुंबई ६१, उल्हासनगर ५, मीरा भाईंदर ४, पालघर १, नाशिक १, पुणे ६, सोलापूर ८, कोल्हापूर २, जालना १, अकोला मनपा १ असे मृत्यू झाले आहेत. तसेच पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीचा मुंबईत मृत्यू झाला आहे. मृत्यूंपैकी ६४ पुरुष तर २७ महिला आहेत. ९१ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४६ रुग्ण आहेत तर ४१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ९१ रुग्णांपैकी ६७ जणांमध्ये ( ७३.६ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृत्यूपैकी ३१ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू १३ एप्रिल ते ४ जून या कालावधीतील आहेत.

 या कालावधीतील ६० मृत्यूंपैकी मुंबई ४४, उल्हासनगर ५, मीरा भाईंदर ४,सोलापूर ४ , नाशिक १ ,पालघर १, इतर राज्ये १,असे मृत्यू आहेत.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५,५१,६४७ नमुन्यांपैकी ८५,९७५ नमुने पॉझिटिव्ह (१५.५८ टक्के ) आले आहेत. राज्यात सध्या कंटेनमेंट ३६५४ झोन क्रियाशील असून आज एकूण १८,५१५ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६९.६० लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ५,,५८,४६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७७,६५४ खाटा उपलब्ध असून सध्या २८,५०४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.