राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७० हजारांवर

२३६१ नवे रुग्ण तर ७६ जणांचा मृत्यू मुंबई :राज्यात सोमवारी २३६१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७० हजार १३ झाली आहे.तसेच ७६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

२३६१ नवे रुग्ण तर ७६ जणांचा मृत्यू  

मुंबई :राज्यात सोमवारी २३६१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७० हजार १३ झाली आहे. तसेच ७६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या  २३६२ वर पोहोचली आहे.सोमवारी ७७९ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याने आजपर्यंत ३० हजार १०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  

राज्यात ७६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मुंबई -४०, मीरा भाईंदर -६, नवी मुंबई -६, वसई विरार -३, रायगड -२, कल्याण डोंबवली -२, ठाणे – १, नाशिक -१, पुणे -८, पिंपरी चिंचवड – १, औरंगाबाद मनपा ३, जालना -१, बीड -१, नागपूर मनपा – १ असे मृत्यू झाले आहेत. नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४५ पुरुष तर ३१ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील ३७ रुग्ण आहेत तर ३६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ७६ रुग्णांपैकी ५१ जणांमध्ये ( ६७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५४ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १४ मे ते २८ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील २२ मृत्यूंपैकी मुंबई ९, नवी मुंबई -५, औरंगाबाद -३, रायगड – २, बीड -१, मीरा भाईंदर -१ आणि ठाणे १ असे आहेत .

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४,७१,५७३ नमुन्यांपैकी ७०,०१३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या कंटेनमेंट ३२९४ झोन क्रियाशील असून आज एकूण १८,६७४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ७०.६९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ५,६७,५५२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२,७०४ खाटा उपलब्ध असून सध्या ३६,१८९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.