सावधान! वाढत्या प्रदूषणाचा विळखा घट्ट होतोय… राज्यातील नागरिकांचे आयुर्मान सरासरी तीन वर्षांनी घटले

मुंबई महानगर प्रदेशातील कारखान्यांत दरवर्षी दोन दशलक्ष टन कोळसा जाळला जातो. मुंबईनजीक १३ औद्योगिक क्षेत्रांपैकी ट्रान्स-ठाणे खाडी, तळोजा, अंबरनाथ आणि डोंबिवली या क्षेत्रात ७० टक्के कार्यरत उद्योगांचा समावेश आहे. हे उद्योग प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत.

    मुंबई : नागरीकरण, विकासाच्या नावाखाली दिवसेंदिवस वायू आणि जलप्रदूषणात वाढ होत आहे. मात्र प्रदूषणाचा हा विळखा महाराष्ट्राला आवळत असून, राज्यातील शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे आयुष्य सरासरी तीन वर्षांनी घटत चालल्याचे समोर आले आहे.

    ही शहरे अतिसंवेदनशील

    राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिक ही शहरे प्रदूषणाच्या बाबतीत अतिसंवेदनशील बनली आहेत.उद्योग, कोळसा ज्वलन, विविध वायू ज्वलन, वाहतूक, कचरा ज्वलन, बांधकामे आणि रस्त्यावरील धूळ, घरगुती प्रदूषण हे प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडानुसार, वायुप्रदूषण एका विशिष्ट मर्यादेत रोखता आले तर महाराष्ट्रातील शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात वाढ होऊ शकते; आणि ही वाढ मुंबई ३.५ वर्षे, ठाणे ३.४ वर्षे, पुणे ३.७ वर्षे, नागपूर ३.९ वर्षे आणि नाशिक २.८ वर्षे अशी असू शकते; मात्र जल व वायुप्रदूषणामुळे येथे राहणाऱ्या लोकांचे आयुष्यमान कमी होत आहे.

    वाढत्या उद्योगांमुळे धोका