कोरोनाची दुसरी लाट दार ठोठावतं आहे ; काळजी घ्या नाहीतर लॉकडाऊन करावाच लागेल  : मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे

राज्यातील विविध शहरात कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रसासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. तसेच राज्य शासनाच्या आदेशाचे व नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जात आहे या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.

    महाराष्ट्रात कोरोना अटोक्यात येत असल्याची चिन्ह दिसत असताना राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. राज्यातील विविध शहरात कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रसासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. तसेच राज्य शासनाच्या आदेशाचे व नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जात आहे या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.

    काय म्हणले मुख्यमंत्री
    राज्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन करावा लागेल असे संकेत त्यांनी दिले. आपल्या राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वार काढतोय. करोनाची लाट पुन्हा आपल्या राज्यात आली की नाही हे पुढील आठ – पंधरा दिवसात कळेल. मात्र आता थोडंसं बंधन तुमच्यावर आणणं गरजेचं आहे. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

    तसेच, कारण नसताना उगाच कुणी आपल्याला घरात बंद करून ठेवणं हे कुणालाच आवडणार नाही. पुढील दोन महिन्यात आणखी एक- दोन कंपन्या आपल्याला लस उपलब्ध करून देणार आहेत. लसीकरणाचे कोणतेही साईडइफेक्ट नाही. लवकरच सर्वसामांन्यांना लस मिळणार. आतापर्यंत नऊ लाखांच्या आसपास लसीकरण झालं. मास्क हीच आपली करोनाच्या लढाईतली ढाल आहे. त्यामुळे लस घेण्या अगोदर व नंतर देखील मास्क घालणं अनिवार्य आहे. शिस्त पाळणं हे आवश्यक आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळा. नियम मोडणाऱ्यांवार कडक कारवाई होणार. असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.