Bollywood actress Shilpa Shetty's husband and famous businessman Raj Kundra arrested; Pornographic video recording case

राज कुंद्राला आधीच पॉर्न बंद केले जाईल याची पूर्व कल्पना आली होती, असे या चौकशीतून समोर आले असून, त्यासाठी त्याने पूर्ण तयारीही केली होती. त्याचबरोबर त्याने यासाठी ‘प्लॅन ‘बी’देखील तयार होता. गुगल प्ले मुळे त्याचे ‘हॉटशॉट’ हे अॅप गेल्या वर्षी 18 नोव्हेंबर रोजी निलंबित करण्यात आले होते. कुंद्राला असे काही होईल याची कल्पना आधीच होती आणि त्यामुळे त्याने प्लॅन बी तयार केला होता. या सगळ्याची चर्चा ही हॉट्सअॅपवर असलेल्या ‘एच’ नावाच्या ग्रुपवर झाली होती.

  मुंबई : पॉर्न व्हिडिओ प्रकरणात अडकलेले रिपू सूदन बालकिशन कुंद्रा ऊर्फ राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. राजविरोधात ठोस पुरावे असल्याचा दावादेखील पोलिसांनी केला आहे. यासोबतच कुंद्राचे भागीदारांसोबत केलेले व्हॉट्सअॅप चॅटही हाती लागल्याचा पोलिसांनी दावा केला. यापैकी काही चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या चॅट्समध्ये राजने ‘प्लान बी’, बोल्ड कंटेंट हटविणे आणि ब्रँडेड सिलेब्सशी संबंधित कंटेंटबाबत चर्चा केली आहे. या प्रकरणानंतर आता कुंद्राचे अश्लीलतेचे सर्व ‘राज’ बाहेर येणार असल्याची चर्चा आहे.

  सोशल मीडियावर व्हायरल चॅटमध्ये राज आणि प्रदीप बक्षी यांच्यात चर्चा झाली आहे. यात पेमेंटपासून ‘सेलडाऊन’ पर्यंतची चर्चा आहे. यात राजने ‘ब्रँडेड सिलेब’वर भर दिला असल्याचे दिसते. मार्केटिंग चांगले राहिले तर अॅपसाठी अन्य देशातही मार्ग खुला असेल, असे प्रदीप यात म्हणतो.

  राज कुंद्राला आधीच पॉर्न बंद केले जाईल याची पूर्व कल्पना आली होती, असे या चौकशीतून समोर आले असून, त्यासाठी त्याने पूर्ण तयारीही केली होती. त्याचबरोबर त्याने यासाठी ‘प्लॅन ‘बी’देखील तयार होता. गुगल प्ले मुळे त्याचे ‘हॉटशॉट’ हे अॅप गेल्या वर्षी 18 नोव्हेंबर रोजी निलंबित करण्यात आले होते. कुंद्राला असे काही होईल याची कल्पना आधीच होती आणि त्यामुळे त्याने प्लॅन बी तयार केला होता. या सगळ्याची चर्चा ही हॉट्सअॅपवर असलेल्या ‘एच’ नावाच्या ग्रुपवर झाली होती.

  गुन्हेगारीचे पंचकलम!

  1. अश्लील चित्रपटांपाठोपाठच अनेक गुन्ह्यांमध्येही कुंद्राचे अनेक ‘राज’ आहेत. 2013चे आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात राजस्थान रॉयल्सचे तो सहमालक होता व त्यास बीसीसीआयने आरोपममुक्त होईपर्यंत निलंबित केले होते.
  2. 2.2017 मध्येही ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला लाखो रुपयांना गंडा घातल्या प्रकरणात त्यांचे आणि शिल्पा शेट्टीचे नाव चर्चेत आले होते.
  3. आयपीएल राजस्थान रॉयलचे पूर्व मालक राज कुंद्रा आणि अभिनेता सचिन जोशी यांनी एकमेकांवर 40 लाखांचा चेक बाऊन्स प्रकरणात फसवणुकीचा आरोप केला होता.
  4. बिटकॉईन घोटाळ्यात राज कुंद्रांना ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने 2018 साली समन्स बजावले होते. दोन हजार कोटींचा हा बिटकॉईन घोटाळा असण्याचे सांगण्यात आले होते.
  5. 2019 मध्ये ऑक्टोबर महिन्यात इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणात राज कुंद्रा यांना ईडीने समन्स बजावले होते. राज कुंद्राचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला होता.