यंत्रणेने परिस्थिती चांगली हाताळली – बाळासाहेब थोरात

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना एनडीआरएफ आणि एस.डी.आर.एफचे दर बाजूला ठेऊन वाढीव मदत करण्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून निकषात बदल केल्याची माहिती

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना एनडीआरएफ आणि एस.डी.आर.एफचे दर बाजूला ठेऊन वाढीव मदत करण्यासाठी  शासनाने विशेष बाब म्हणून  निकषात बदल केल्याची  माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली तसेच हे शासन खंबीरपणे  कोकणातील नुकसानग्रस्तांच्या पाठीशी उभे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात  यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित होते. त्यावेळी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी चक्रीवादळामध्ये सतर्कता काय असते, याबबात त्यांनी सांगितलं आहे.

सतर्कता काय असते हे निसर्ग चक्रीवादळाच्या निमित्ताने दिसून आल्याचे स्पष्ट करून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, एनडीआरएफ, एसडीआरएफ, महसूल यंत्रणा, पोलीस आणि इतर सर्वच यंत्रणांनी निसर्ग चक्रीवादळात चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली. जीवित हानी होऊ नये यासाठी प्रयत्न केले. आता नुकसानभरपाईच्या रकमेत चांगली वाढ करून शासनाने नुकसानग्रस्तांना दिलासा दिल्याचेही ते म्हणाले.