महापालिकेचा क्रीडा विभागाचे तिसऱ्यांदा स्थलांतर

स्टेडियमची डागडुजी, ऑडिट आणि इतर कारणांमुळे क्रीडा विभाग स्टेडियममधून हलवून पिंपरी येथील ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले इमारत येथे आणण्यात आला आहे.

पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाचे स्थलांतर प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे करण्यात आले आहे. क्रीडा विभागाचे तिसऱ्यांदा स्थलांतर झाले आहे. सुरुवातीला पालिकेच्या क्रीडा विभागाचे कार्यालय नेहरूनगर पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे होते. स्टेडियमची डागडुजी, ऑडिट आणि इतर कारणांमुळे क्रीडा विभाग स्टेडियममधून हलवून पिंपरी येथील ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले इमारत येथे आणण्यात आला आहे. काही दिवसांच्या वास्तव्यानंतर ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले इमारतीत असलेल्या क्रीडा विभागाच्या कार्यालयाची जागा इतर कार्यालयाला देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे क्रीडा विभागाला पुन्हा हलवण्यात आले आहे.

क्रीडा विभागाचा नवीन पत्ता –
१५ प्रेमलोक, सर्व्हे नंबर १६५/२ व १६६,
पहिला मजला, प्रेमलोक पार्क बस स्थानकासमोर,
चिंचवड –४११०३३