प्रतिक्षा संपली! आज इयत्ता १० वीचा निकाल ; असा पहा ‘ऑनलाईन’ निकाल

सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत इ. १० वी निकालासाठी सुधारित अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेत परीक्षा मंडळांचा मोठा वाटा असून शाळा व शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली. ह्या उल्लेखनीय कामगिरी आणि सहकार्याबद्दल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आभार मानले

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल आज दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होणार आहे.सर्व विद्यार्थ्यांना “दैनिक नवराष्ट्र”तर्फे शुभेच्छा!

    एकूण आठ माध्यमानुसार सन २०२०-२१ वर्षातील एसएससी (इ. १० वी ) परीक्षेला एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी ९ लाख ०९ हजार ९३१ मुलं असून मुलींची संख्या ७ लाख ४८ हजार ६९३ एवढी आहे.पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत सन २०२१ मध्ये इ.१०वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, www.mahahsscboard.in या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.