अकरावी प्रवेशाची तिसरी यादीही नव्वदीपारच,मिळेल त्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची विद्यार्थ्यांची तयारी

इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशाची(Eleventh Online Admission) तिसरी गुणवत्ता यादी १३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता जाहीर करण्यात आली. यामध्ये अर्ज(Application For Eleventh Admission) केलेल्या १ लाख १० हजार ४६१ विद्यार्थ्यांपैकी ३९ हजार ९६४ विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलाॅट(Allotment Of Eleventh Standard) करण्यात आल्या आहेत.

    मुंबई: इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशाची(Eleventh Online Admission) तिसरी गुणवत्ता यादी १३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता जाहीर करण्यात आली. यामध्ये अर्ज(Application For Eleventh Admission) केलेल्या १ लाख १० हजार ४६१ विद्यार्थ्यांपैकी ३९ हजार ९६४ विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलाॅट(Allotment Of Eleventh Standard) करण्यात आल्या आहेत. पहिल्या दोन गुणवत्ता याद्या नव्वदीपार राहिल्याने तिसऱ्या यादीबाबत विद्यार्थ्यांना आशा होती. मात्र नामवंत महाविद्यालयांमधील तिसरी गुणवत्ता यादीही नव्वदीपारच राहिल्याने अनेक विद्यार्थ्यांकडून पुढील यादीची वाट न पाहता मिळेल त्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची तयारी करण्यात आली आहे.

    पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये नामवंत महाविद्यालयांमध्ये अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्याने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळण्याची आशा त्यांना होती. मात्र नामवंत महाविद्यालयातील तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादीही नव्वदी पारच राहिल्याने या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला असून, त्यांच्याकडून मिळेल त्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे.

    तिसऱ्या यादीसाठी उपलब्ध असलेल्या १ लाख १९ हजार ३३३ जागांसाठी तब्बल १ लाख १० हजार ४६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यामध्ये अ‍ॅलॉट झालेल्या ३९ हजार ९६४ जागांपैकी २५ हजार ५३९ जागा वाणिज्य शाखेसाठी ११ हजार ५७ जागा विज्ञान शाखेतील तर कला शाखेतील ३१५२ आणि एचएसीव्हीसी अभ्यासक्रमासाठी २१५ जागा अ‍ॅलॉट झाल्या आहेत. यामध्ये एसएससी बोर्डातील १ लाख ४० हजार ७७ विद्यार्थ्यांपैकी ३७ हजार ३२७ विद्यार्थ्यांना प्रवेश अ‍ॅलॉट करण्यात आला आहे. तर सीबीएसईच्या २९३५ विद्यार्थ्यांच्या अर्जांपैकी १०२२ विद्यार्थी, आयसीएसईच्या २२४७ विद्यार्थ्यांच्या अर्जापैकी ११३७ विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलॉट झाली आहे. तर अन्य मंडळाच्या १२०२ विद्यार्थ्यांपैकी ४७८ विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलॉट झाल्या आहेत. तिसऱ्या यादीमध्ये ६९१६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे तर दुसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय ७३६४, तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय ५९६९ आणि चौथ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय ५०५२ विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या ३३ हजार ३२७, एससी ३१२९, एसटी १७०, एनटी ५०६, ओबीसी २३७७, विशेष मागास वर्ग २६१ तर ईडब्ल्यूएस प्रवर्गातील २६१ विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलॉट झाल्या आहेत.