यंदा नवरात्रीत गरबा, दांडियांना बंदी, राज्य सरकारची नियमावली जारी

मुंबई: राज्यात कोरोनाचा वाढलेल्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन नवरात्री , दुर्गापूजा आणि दसऱ्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार यंदा गरबा, दांडिया कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन गर्दी न करता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई: राज्यात कोरोनाचा वाढलेल्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन नवरात्री , दुर्गापूजा आणि दसऱ्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार यंदा गरबा, दांडिया कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन गर्दी न करता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सरकारच्या मोहिमेचा प्रचार जनतेच्या हितासाठी करण्याचेही आवाहन यात करण्यात आले आहे.

ही आहे नियमावली
– सार्वजनिक नवरात्रौत्सवातील देवीची मूर्ती ४ फूटांपेक्षा तर घरगुती मूर्ती २ फूटांपेक्षा मोठी नसावी.
– यंदा देवीची मिरवणूक काढता येणार नाही.
– मंडपांमध्ये सॅनिटाझयरचा वापर करावा लागेल.
-दर्शन रांगांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा लागेल

पूर्वपरवानगी आवश्यक
– सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी महापालिका/ स्थानिक प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक.
– कोरोनाची परिस्थिती पाहता न्यायालय, महापालिका आणि स्थानिक प्रशासनाने मंडपासाठी आखलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य.
– नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्यामुळे सार्वजनिक आणि घरगुती नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्तीची सजावट तशीच असावी.

रावणदहनासाठी परवानगी
राज्य सरकारने नवरात्रीमुळे जाहीर केलेल्या नियमावलीत दांडिया, गरबा याला बंदी घालण्यात आली असली तरी दसऱ्याच्या दिवशी मात्र रावण दहन करता येणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला गर्दी होणार नाही. सुरक्षित सामाजिक अंतर पाळलं जाणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.