राज्यात ३६०७ नवे रुग्ण तर १५२ जणांचा मृत्यू

मुंबई :राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना सलग तीन दिवसांपासून राज्यामध्ये तीन हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडत असून गुरुवारीही संख्या वाढही कायम राहिली आहे.राज्यात गुरुवारी

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना सलग तीन दिवसांपासून राज्यामध्ये तीन हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडत असून गुरुवारीही संख्या वाढही कायम राहिली आहे.राज्यात गुरुवारी ३६०७ नवे रुग्ण सापडले असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९७ हजार ६४८ झाली आहे. तर १५२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ३५९० वर पोहोचली आहे. 

राज्यात १५६१ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून राज्यात आजपर्यंत ४६ हजार ७८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.२ टक्के एवढे आहे.राज्यात १५२ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबई ९७, मीरा भाईंदर ९, कल्याण डोंबिवली ७, नवी मुंबई ४, वसई विरार २, नाशिक ५, पुणे ८, सोलापूर ८, रत्नागिरी १, औरंगाबाद ६, हिंगोली १, जालना १, लातूर २, नांदेड १ असे मृत्यू आहेत. मृत्यूंपैकी १०२ पुरुष तर ५० महिला आहेत. आज नोंद झालेल्या १५२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ८५ रुग्ण आहेत तर ५४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या १५२ रुग्णांपैकी १०७ जणांमध्ये ( ७०.३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृत्यूपैकी ३५ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू १ एप्रिल ते ८ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ११७ मृत्यूंपैकी मुंबई ८७, मीरा भाईंदर ८, कल्याण डोंबिवली ७, सोलापूर ७ , नवी मुंबई ४, नाशिक ३ आणि वसई विरार १ असे आहेत.
 
राज्यात सध्या ५४ शासकीय आणि ४१ खाजगी अशा एकूण ९५ प्रयोगशाळा कोविड १९ निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६,०९३१७ नमुन्यांपैकी ९७,६४८ नमुने पॉझिटिव्ह (१६ टक्के ) आले आहेत. सध्या राज्यात ५,७३,६०६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५,४९३ खाटा उपलब्ध असून सध्या २८,०६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.