राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद – ३२५४ नवे रुग्ण तर १४९ रुग्णांचा मृत्यू

मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबधिताची संख्या दिवसेदिवस वाढत आहे, ही बाब आरोग्य विभागासाठी चिंतेची ठरत आहे. आज आतापर्यंतचे सर्वाधिक ३२५४ कोरोना रुग्ण सापडले. राज्यातील

 मुंबई:  मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबधिताची संख्या दिवसेदिवस वाढत आहे, ही बाब आरोग्य विभागासाठी चिंतेची ठरत आहे. आज आतापर्यंतचे सर्वाधिक ३२५४ कोरोना रुग्ण सापडले. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९४ हजार ४१ झाली आहे. तसेच १४९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३४३८ इतकी झाली आहे. आज १८७९ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आल्याने आजपर्यंत एकूण ४४ हजार ५१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.३४ टक्के एवढे आहे.

राज्यात १४९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू झाला असून त्यामध्ये मुंबई ९७, ठाणे १५, नवी मुंबई ५, उल्हासनगर ३, वसई विरार २, जळगाव ५, पुणे १०, औरंगाबाद ७, बीड १, अकोला २, अमरावती १, गडचिरोली १ असे आहेत. मृत्यूंपैकी ९४ पुरुष तर ५५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १४९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ८७ रुग्ण आहेत तर ४९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या १४९ रुग्णांपैकी १०४ जणांमध्ये ( ७० %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृत्यूपैकी ६६ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू १८ एप्रिल ते ६ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ८३ मृत्यूंपैकी मुंबई ५८, ठाणे ९, नवी मुंबई ५, जळगाव ४,उल्हासनगर ३, वसई विरार २,अमरावती १ आणि गडचिरोली १ असे आहेत.
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५,९३,७८४ नमुन्यांपैकी ९४,०४१ नमुने पॉझिटिव्ह (१५.८३ टक्के ) आले आहेत. राज्यात सध्या कंटेनमेंट ३८९७झोन क्रियाशील असून आज एकूण १८,३८४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६७.६५ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ५,६९,१४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५,७२७ खाटा उपलब्ध असून सध्या २७,२२८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.