राज्यात ३४२७ नवे रुग्ण; ११३ जणांचा मृत्यू

मुंबई: मुंबई राज्यातील रुग्णांची संख्या एक लाखाच्या पार पोहोचली असताना त्यातील निम्मे कोरोना रुग्ण आजपर्यंत बरे झाले आहेत. राज्यामध्ये आज ३४२७ कोरोनाचे नवे रुग्ण सापडल्याने राज्यातील

 मुंबई:  मुंबई राज्यातील रुग्णांची संख्या एक लाखाच्या पार पोहोचली असताना त्यातील निम्मे कोरोना रुग्ण आजपर्यंत बरे झाले आहेत. राज्यामध्ये आज ३४२७ कोरोनाचे नवे रुग्ण सापडल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४ हजार ५६८ वर पोहोचली आहे. त्याचवेळी राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.२ टक्के असल्याने आतापर्यंत राज्यात सापडलेल्या १ लाख ४ हजार ५६८ कोरोना रुग्णांमधील निम्मे रुग्ण म्हणजे तब्बल ४९ हजार ३४६ रुग्ण बरे झाले आहेत.

 वाढती रुग्ण संख्या ही जरी चिंतेची बाब ठरत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण निम्म्यावर असल्याने ही बाब राज्यासाठी दिलासादायक ठरत आहे. 
राज्यात शनिवारी ११३ कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले असून आतापर्यंत ३८३० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई ६९, ठाणे ३, नवी मुंबई ८, कल्याण डोंबिवली १, पनवेल ६, पुणे १०, सोलापूर -८, सातारा – १, औरंगाबाद ३, लातूर २, नांदेड १, यवतमाळ १ असे मृत्यू आहेत. मृत्यूंपैकी ७३ पुरुष तर ४० महिला आहेत. 
 
आज नोंद झालेल्या ११३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६५ रुग्ण आहेत तर ३८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १० जण ४० वर्षांखालील आहे. या ११३ रुग्णांपैकी १० रुग्णांच्या इतर अतिजोखमीच्या आजाराबद्दल माहिती उपलब्ध नाही. उर्वरित १०३ रुग्णांपैकी ८३ जणांमध्ये ( ८०.६ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. 
 
मृत्यूपैकी ७३ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २७ मे ते १० जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ४० मृत्यूंपैकी मुंबई १९, नवी मुंबई ८, सोलापूर ४, ठाणे ३, पनवेल ३, कल्याण डोंबिवली १, पुणे १ आणि सातारा १ मृत्यू असे आहेत.राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोविड १९ निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६,४१,४४१ नमुन्यांपैकी १,०४,५६८ नमुने पॉझिटिव्ह (१६.३ टक्के ) आले आहेत. सध्या राज्यात ५,८३,३०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५८० संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७९,०७४ खाटा उपलब्ध असून सध्या २८,२०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.