आज राज्यात २५९८ नवीन रुग्णांचे निदान

राज्यात ८५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद मुंबई :राज्यात गुरुवारी २५९८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५९ हजार ५४६ झाली आहे. तर राज्यात ८५ करोना बाधित

राज्यात ८५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद

मुंबई  : राज्यात गुरुवारी २५९८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५९ हजार ५४६ झाली आहे. तर राज्यात ८५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या १९८२ वर पोहचली आहे. असे असले तरी राज्यातील कोरोना मृत्यू दर ३. ३२ टक्के इतका आहे. तसेच  ६९८ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने आजपर्यंत १८ हजार ६१६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३१.२६ टक्के एवढे आहे.

राज्यात ८५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यामध्ये मुंबई ३८, वसई विरार ४, ठाणे  ४, नवी मुंबई  २, रायगड  १,  जळगाव १, पुणे मनपा १०, सातारा ९, सोलापूर मनपा ७, औरंगाबाद ३, नांदेड मनपा १, अकोला मनपा ५ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६० पुरुष तर २५ महिला आहेत. ८५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४५ रुग्ण आहेत तर ३१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ९ जण ४० वर्षांखालील आहे. या ८५ रुग्णांपैकी ४५ जणांमध्ये ( ५३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी ३७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १५ मे ते २५ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ४८ मृत्यूंपैकी मुंबई २२, सोलापूर -५ , अकोला ४, औरंगाबाद ३, सातारा -३, ठाणे -३, वसई विरार -३, जळगाव -१, नांदेड -१, नवी मुंबई -१, पुणे -१ आणि रायगड येथील १ मृत्यू आहे. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४,१९,४१७ नमुन्यांपैकी ५९,५४६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या कंटेनमेंट २८१६ झोन क्रियाशील असून आज एकूण १७,२११ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६५.६१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ६,१२,७४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५,१२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधीत रुग्ण- (३५,४८५), बरे झालेले रुग्ण- (८६५०), मृत्यू- (११३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५६९४) 

ठाणे: बाधीत रुग्ण- (८२२०), बरे झालेले रुग्ण- (२३००), मृत्यू- (१५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७६५)

पालघर: बाधीत रुग्ण- (८२५), बरे झालेले रुग्ण- (२७३), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२९) 

रायगड: बाधीत रुग्ण- (९४४), बरे झालेले रुग्ण- (४८८), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२८) 

नाशिक: बाधीत रुग्ण- (१०४३), बरे झालेले रुग्ण- (७५५), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३६) 

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (९२), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८) 

धुळे: बाधीत रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (६७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३) 

जळगाव: बाधीत रुग्ण- (५२६), बरे झालेले रुग्ण- (२३९), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३५) 

नंदूरबार: बाधीत रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९) 

पुणे: बाधीत रुग्ण- (६८९६), बरे झालेले रुग्ण- (३२४२), मृत्यू- (३०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३५३) 

सोलापूर: बाधीत रुग्ण- (७११), बरे झालेले रुग्ण- (३०३), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४९) 

सातारा:  बाधीत रुग्ण- (४२९), बरे झालेले रुग्ण- (१२८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८५) 

कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (३५१), बरे झालेले रुग्ण- (३६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१४) 

सांगली: बाधीत रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४) 

सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२) 

रत्नागिरी:  बाधीत रुग्ण- (२०४), बरे झालेले रुग्ण- (७६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२३) 

औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१३७०), बरे झालेले रुग्ण- (८७९), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३१) 

जालना: बाधीत रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३) 

हिंगोली: बाधीत रुग्ण- (१४३), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१) 

परभणी: बाधीत रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८) 

लातूर: बाधीत रुग्ण- (१०७), बरे झालेले रुग्ण- (५०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४) 

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (५४), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२) 

बीड: बाधीत रुग्ण- (४१), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (३८) 

नांदेड: बाधीत रुग्ण- (१०८), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३) 

अकोला: बाधीत रुग्ण- (५२९), बरे झालेले रुग्ण- (२५०), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५०) 

अमरावती: बाधीत रुग्ण- (१९७), बरे झालेले रुग्ण- (९०), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९३) 

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (११६), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४) 

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (५५), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४) 

वाशिम: बाधीत रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३) 

नागपूर: बाधीत रुग्ण- (४९५), बरे झालेले रुग्ण- (३३६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५०) 

वर्धा: बाधीत रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०) 

भंडारा: बाधीत रुग्ण- (२०), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९) 

गोंदिया: बाधीत रुग्ण- (५१), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०) 

चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०) 

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (२८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८) 

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (५४), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१) 

एकूण: बाधीत रुग्ण-(५९,५४६), बरे झालेले रुग्ण- (१८,६१६), मृत्यू- (१९८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टीव्ह रुग्ण-(३८,९३९)