राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता? हवामान विभागाचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार (torrential rains  in the state) पाऊस कोसळत आहे. तसेच परतीच्या पावसामुळे अनेक जणांची शेती आणि पिके उद्धवस्त झाले आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाची दिशा थेट महाराष्ट्रावर नसल्याने त्याचा राज्याच्या दृष्टीने प्रभाव क्षीण ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार (torrential rains  in the state) पाऊस कोसळत आहे. तसेच परतीच्या पावसामुळे अनेक जणांची शेती आणि पिके उद्धवस्त झाले आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाची दिशा थेट महाराष्ट्रावर नसल्याने त्याचा राज्याच्या दृष्टीने प्रभाव क्षीण ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवसांच्या काळात मध्यम स्वरूपाचा, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

२१ ऑक्टोबरला दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याचा इशारा आहे. २२ ऑक्टोबरला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रात मात्र दोन ते तीन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, आणि इतर राज्यांत सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.