तृप्ती देसाईला शिर्डीत येण्यास बंदी; प्रांताधिकारी यांचा आदेश

शिर्डीकर नागरिक साईभक्त व महिलांमधे तृप्ती देसाई यांच्या विरोधात तीव्र संताप पसरला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये,याची खबरदारी प्रशासन घेत आहे.

शिर्डी: तृप्ती देसाईंना शिर्डी हद्दीत प्रवेश करण्यास ८ डिसेंबर ते ११ डिसेंबर पर्यंत बंदी घालण्यात आली असून, उपविभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी याबाबतची नोटीस बजावली आहे.  तृप्ती देसाई यांनी दि १० डिसेंबर रोजी शिर्डी येथे येण्याचा निर्णय जाहीर केला होता, त्यावर ही नोटीस बजावण्यात आलेली आहे.

देसाई यांनी शिर्डी येऊन शिर्डी संस्थानच्या आवारातील फलक काढणार असा इशारा सुद्धा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देऊन जर देसाई या शिर्डीमध्ये आल्या तर त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल असा इशारा सुद्धा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला होता.

देसाई यांनी शिर्डी येथे येऊ नये त्या आल्या तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा प्रकारची नोटीस शिर्डीचे उपविभागीय दंडाधिकारी शिंदे यांनी बजावली आहे.  देसाई यांना दिनांक आठ ते ११ डिसेंबर पर्यंत शिर्डीमध्ये येण्यास मनाई केली आहे सदरची नोटीस बजावल्यानंतर प्रशासनाच्यावतीने देसाई यांच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन ही नोटीस बजावली आहे.  शिर्डीकर नागरिक साईभक्त व महिलांमधे तृप्ती देसाई यांच्या विरोधात तीव्र संताप पसरला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी प्रशासन घेत आहे.