प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

५५ हजार किमतीचे दोन गावठी कट्टे पवारवाडी पोलीसांनी जप्त करुन त्याला ताब्यात घेतले आहे.

 

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्ग म्हाळदे पुलाखालून गुलशने इब्राहीम कडे जाणार्‍या रस्त्यावर एकबाल भुर्‍या याचे गॅरेज समोर शेख हबीब शेख शब्बीर (३५) रा. म्हाळदे शिवार गट नं. १३३, अश्पाक मशीद जवळ महेमूद नगर याचे कबजातून ५५ हजार किमतीचे दोन गावठी कट्टे पवारवाडी पोलीसांनी जप्त करुन त्याला ताब्यात घेतले आहे.
आज पहाटे साडेबाराच्या सुमारास पवारवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. या घटनेची फिर्याद पो.ना.राकेश उबाळे यांनी दाखल केली आहे. पवारवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि काळे, पो. हवालदार धारणकर व पो.कॉ.भामरे, जाधव आदी कर्मचारी ओबाडी नाला भागात रात्रीचे गस्तीवर असताना त्यांना मिळालेल्या माहितीवरुन म्हाळदे पुलाखालून जाणार्‍या रस्त्यावर एक इसम संशयास्पद उभा दिसला. तो पोलिसांना पाहून पळू लागला म्हणून त्याचे मागे पाठलाग करुन पहाटे १ वाजेच्या सुमारास पकडून त्याची विचारपूस केली असता त्याचे कमरेला दोन गावठी कट्टे (अग्नीशस्त्रे) एक ३० हजार किमतीचे व दुसरे २५ हजार किमतीचे असे मिळून आले. त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.