महावितरणच्या थंड कारभाराचा बेरोजगार अभियंत्यांना मोठा फटका ?

  • महावितरणच्या थंड कारभाराचा मोठा फटका राज्यातील ३२७ बेरोजगार अभियंत्यांना बसला आहे. महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंत्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. या रितक्त पदांच्या भरण्यासाठी महावितरणने जून २०१९ मध्ये जाहिरात काढली होती. तसेच लेखी परीक्षा झाली असून निवड यादी जाहीर करण्यात आली.

लॉकडाऊनच्या काळात कनिष्ठ अभियंता या पदासाठी महावितरणने १३  नोव्हेंबर २०१९  रोजी लेखी परीक्षा घेतली. त्यानंतर जानेवारीमध्ये निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. परंतु या गोष्टीला सहा महिने उलटल्यानंतरही महावितरणने संबंधितांना नियुक्ती पत्र दिलेले नाही. त्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही सदर अभियंते आजही बेरोजगारच आहेत.

महावितरणच्या थंड कारभाराचा मोठा फटका राज्यातील ३२७  बेरोजगार अभियंत्यांना बसला आहे.  महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंत्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. या रितक्त पदांच्या भरण्यासाठी महावितरणने जून २०१९ मध्ये जाहिरात काढली होती. तसेच लेखी परीक्षा झाली असून निवड यादी जाहीर करण्यात आली.

महावितरणसोबतच मुंबई महापालिका आणि मुंबई मेट्रोने विविध पदांसाठी जाहिरात काढली होती. मात्र प्रशासनाने नियुक्ती पत्र देण्याबाबत वेळ काढूपणा अवलंबल्याने उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.