विकेंड सुट्टी , सहलीसाठी पर्यटन स्थळांवर गर्दी करणाऱ्यांना पर्यटकांना उर्मिला मातोंडकरांचे काळजी घेण्याचे आवाहन

पर्यटकांनी थोडा संयम पाळायला हवा व कोरोनाबाबतची योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. मास्क घालणे, गर्दी न करणे, सामाजिक अंतर पाळणे या बाबतही खबरदारी घेतली पाहिजे. तसेच स्वतःची व आपल्या मुलाबाळांची काळजी घ्यायला हवी.

    पुणे : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरला आहे. कोरोना काळात हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यातही कोरोनाची रुग्णसंख्या बरीच कमी झाली आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर शहरात कोरोना नियमावलीत बरीच शिथिलता आणण्यात आली आहे. मात्र नियमांमध्ये शिथिलता येताच पुणेकरांना कोरोना विसर पडलेला पाहावयाला मिळालेला आहे. मागेले काही दिवसापासून राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यातही पावासाने हजेरी लावली आहे. पावसामुळे खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. हेच पाहता आता पुणेकरांनी धरणावर गर्दी केल्याचं चित्र आहे.
    मात्र नागरिकांच्या या गर्दीकडे पोलिसांचे दुर्लक्ष असलेलं दिसून आले आहे.

    दुसरीकडे मुंबई-पुण्यातील अनेकजण सहलीसाठी विकेंड सुट्टीत महाबळेश्वर, पाचगणी परिसरात हजेरी लावत आहेत. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाली आहे. दरम्यान, वाढत असलेल्या गर्दीबाबत प्रसिद्ध अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी चिंता व्यक्त केली असून सहलीला येणाऱ्या पर्यटकांनी कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी पर्यटकांना केलेय.

    काही भागात लॉकडाउन उठविला गेला असला, तरी महाबळेश्वर परिसरात मजा करायला येत असला, तर कृपया कोरोना बाबतची सावधानता बाळगायला हवी, असे आवाहन बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केली.बॉलिवूड अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर या आपल्या कुटुंबीयासोबत काही दिवसांपासून महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील एका बंगल्यामध्ये विश्रांतीसाठी मुक्कामी आहेत.

    पर्यटकांनी थोडा संयम पाळायला हवा व कोरोनाबाबतची योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. मास्क घालणे, गर्दी न करणे, सामाजिक अंतर पाळणे या बाबतही खबरदारी घेतली पाहिजे. तसेच स्वतःची व आपल्या मुलाबाळांची काळजी घ्यायला हवी. महाबळेश्वर परिसरातील नागरिकांनाही काही होणार नाही, या बाबत दक्षता घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.