वर्षा गायकवाड यांच्या विद्यार्थ्यांना टिव्हीच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण देण्याच्या मागणीला दूरदर्शनकडून केराची टोपली

मुंबई :शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल आणि ऑनलाईन शिक्षण पुरवण्यासाठी दूरदर्शन व केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला मात्र त्यांच्या

 मुंबई : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल आणि ऑनलाईन शिक्षण पुरवण्यासाठी दूरदर्शन व केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला मात्र त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली जात असल्याची कबुली गायकवाड यांनी दिली. आपण अनेकदा दूरदर्शनसाठी पत्रव्यवहार करत असून आपल्याला त्यासाठी दाद मिळाली नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही त्यासाठी विनंती केली होती परंतु अद्याप आपल्याला प्रतिसाद मिळाला नसल्याची ची माहिती त्यांनी आज आज पत्रकार परिषदेत दिली. यामुळेच आपण टाटा स्काय आणि जिओ या खाजगी कंपन्यांच्या चॅनलचा पर्याय निवडला असल्याचे त्या म्हणाल्या.

राज्यात कालपासून शैक्षणिक सत्राला सुरू झाले असून त्यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून राज्यभरात सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणाची माहिती दिली. जुलैमध्ये नववी आणि दहावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू होत असून त्यासाठी आम्ही या वर्गाची पुस्तके बाजारात उपलब्ध केली आहेत आणि ऑनलाईन ठेवण्यात आली आहेत. ऑनलाईन शिक्षणासाठी राज्यभरात दीक्षा या अॅपचा वापर चांगला होतोय, ज्या ठिकाणी स्मार्ट फोनचां वापर होत नाही त्यांच्यासाठी पर्याय आणत आहोत. रेड झोनमधील शाळा आम्हाला आताच सुरू करायच्या नाहीत, पण ग्रामीण भागात आम्ही  त्या सुरू करणार आहोत. कोणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणासाठी पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत आहोत. मुलांचे आयुष्य महत्त्वाचे आहे, त्यांचे शिक्षण महत्त्वाचे आहे, त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी काही आम्ही सुरुवातील ऑनलाईन शिक्षण आणत आहोत. यासाठी राज्यातील सर्व तज्ञ आणि पालक संघटनांशी आम्ही सर्वांची चर्चा केली असल्याची माहिती त्यांनी दिली. दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीचा विषय आणला जाईल, मात्र तोपर्यंत आत्ता बारावीचा अभ्यासक्रम बदलला, त्याच्या ऑनलाईन अभ्यासक्रमाची तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भात पालकांमध्ये गैरसमज पसरवला जातोय तोही लवकरच दूर होईल असे त्या म्हणाल्या.