येत्या १ जूनपासून लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार का ? विजय वडेट्टीवारांनी दिलंय ‘हे’ उत्तर

येत्या १ जूनपासून सर्वसामान्यांना लोकलमधून(Local Travel for everyone) प्रवास करता येणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासंदर्भात राज्याचे पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

    लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केल्यानंतर गेले अनेक महिने मुंबई लोकल सेवा (Local Trains) बंद होती. दरम्यान, मुंबई लोकल(Mumbai Local) सुरु झाल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा मिळाली होती. त्यानंतर टप्प्याटप्याने सर्वांनाच लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र महाराष्ट्रासह(Maharashtra) संपूर्ण देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्वसामान्यांना लोकमधून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली. मात्र, महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यास राज्य सरकारला यश आले आहे.

    यामुळे येत्या १ जूनपासून सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करता येणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासंदर्भात राज्याचे पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

    विजय वडेट्टीवार म्हणाले, मुंबई लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहे. ज्यामुळे कोरोना रुग्णांच्या आकड्यात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई लोकलवर आणखी काही दिवस निर्बंध लावणे आवश्यक आहे. सरसकट सूट दिली तर, पुन्हा गर्दी होईल. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी आणखी १५ दिवस तरी लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु करता येणे शक्य नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

    तसेच राज्य सरकार येत्या १ जूनपासून काही गोष्टींवरील निर्बंध मागे घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. राज्यातील पुढील ५ ते ६ दिवसांची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. रेड झोनमधल्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला नाही तर कडक लॉकडाऊन कायम राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.