लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार का ? विजय वडेट्टीवारांनी दिलंय ‘हे’ उत्तर

अनलॉकच्या टप्प्यांमध्ये मुंबई(Mumbai) तिसऱ्या टप्प्यात आहे. जेव्हा मुंबई अनलॉकच्या पहिल्या टप्प्यामध्ये येईल त्यावेळी मुंबई लोकल (Local For Everyone) सुरु केली जाईल, असं वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी सांगितलं आहे.

    मुंबई:राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी मुंबईमध्ये लोकल सेवा(local Service) कधी सुरु करण्यात याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. सध्या अनलॉकच्या लेव्हल(Unlock Level) करण्यात आल्या आहेत. या अनलॉकच्या टप्प्यांमध्ये मुंबई(Mumbai) तिसऱ्या टप्प्यात आहे. जेव्हा मुंबई अनलॉकच्या पहिल्या टप्प्यामध्ये येईल त्यावेळी मुंबई लोकल (Local For Everyone) सुरु केली जाईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

    कोरोना अजून गेलेला नसल्यामुळे लोकांनी जबाबदारीनं वागावं, असं देखील वडेट्टीवार म्हणाले. लोकांनी जबाबदारीनं वागल्यास कोरोना निर्बंध कमी होतील, असं त्यांनी सांगितलं.

    राज्यात अनलॉकिंगची प्रक्रिया सुरु झाली आहे. पण सर्वांनी लक्षात ठेवावं की कोरोना गेलेला नाही. मास्क वापरा, सोशल डिस्टनिंग पाळा, असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलं आहे. तसंच आपला जिल्हा कुठल्या टप्प्यामध्ये ठेवायचा हे आता जनतेनं ठरवायचं आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. मुंबईत अजून लोकलबाबत निर्णय झालेला नाही. कारण मुंबई सध्या तिसऱ्या टप्प्यात आहे. मुंबईतली परिस्थिती सुधारली तर आम्ही लोकलविषयी निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं आहे.