१ जूननंतर महाराष्ट्रात लॉकडाऊन असेल का ? विजय वडेट्टीवारांनी केलं मोठं विधान

लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. दरम्यान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी लॉकडाऊनसंबंधी(Lockdown) महत्वाचं विधान केलं आहे.

  मुंबई : राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन(Lockdown in Maharashtra) १ जून रोजी संपत आहे. लॉकडाऊन पुन्हा वाढवला जाणार की उठवला जाणार यासंबंधी चर्चा सुरु आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सध्या राज्य सरकारकडून तयारी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. दरम्यान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी लॉकडाऊनसंबंधी(Lockdown) महत्वाचं विधान केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

  विजय वडेट्टीवार म्हणाले, रेड झोनमधील गावांना सध्या कोणताही धोका पत्करण्याची गरज नाही. त्या जिल्ह्यात जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या तालुक्यांमध्ये कडक निर्बंध करावेत आणि ज्या तालुक्यात रुग्ण नाही तिथे थोडी सवलत द्यावी. तसंच बाकीच्या जिल्ह्यात मात्र टप्प्याटप्य्याने लॉकडाऊन कमी करावा आणि शिथीलता द्यावी असा विचार असून त्यादृष्टीने पाऊल टाकत आहोत.

  लोकल बंदच
  विजय वडेट्टीवार म्हणाले “मुंबईची लोकल सुरु करु नका कारण तिथे कोरोनाचा मोठा फैलाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे रेल्वेत जी गर्दी होते त्याचा गांभीर्याने विचार व्हावा,अशी अनेकांची मागणी आहे. म्हणून आम्ही अत्यावश्यक सेवा सोडून कोणालाही लोकलने प्रवास करण्याची परवानगी देणार नाही.

  “राज्यात ३१ तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे. राज्यातील १५ जिल्हे असे आहेत जिथे पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. काही जिल्ह्यात तीन ते पाच टक्के प्रमाण आहे. सरसकट लॉकडाउन उठवता येत नाही. परिस्थितीचा आढावा घेऊनच लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाऊन सरसकट उठवणं अडचणीचं ठरेल. निर्बंध शिथील करण्यासंबंधी मुख्यमंत्री ३१ मे च्या आधी निर्णय घेतील,” असं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

  लॉकडाऊनबाबत ते म्हणाले की, “सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कोणीहा गाफील राहू नये”.