पदोन्नतीतील आरक्षणावर लवकरच तोडगा निघेल, नितीन राऊत यांची ग्वाही

मी नाराज नाही तर पदोन्नतीत आरक्षण मिळण्यासाठी कायदेशीररित्या चर्चा सुरू आहे, असे नितीन राऊत(Nitin Raut) यांनी म्हटले आहे.

    मुंबई: पदोन्नती (Promotion)या विषयावर उपमुख्यमंत्र्यांकडे एक विशेष बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी पक्षाचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ, वर्षाताई गायकवाड आणि के सी पाडवी ही सर्व मंडळी उपस्थित होते. या विषयासंबंधी सकारात्मक सांगोपांग चर्चा झालेली आहे आणि या विषयावर तोडगा निघेल याची मला खात्री असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

    ते पुढे म्हणाले की, ७ मे चा जीआर रद्द होईल. त्यामध्ये सरकारची भूमिका अजित पवार यांनी मांडलेली आहे. यावर सर्वांनी अभ्यास करायचं ठरवलं आहे. कायदेशीर बाबी अनेक आहेत तशाच अनेक बाबी आहेत आणि सकारात्मक निर्णय होईल.

    नितीन राऊत यांनी सांगितलं की, तीन पक्षांच सरकार आहे आता निर्णयाप्रत पोचायचं तर दरम्यानच्या काळामध्ये मुंबई हाय कोर्टामध्ये याचिका दाखल आहे. त्याची तारीख २१ असल्यामुळे थोडासा पेच निर्माण झालेला आहे तरी या संबंधीचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि तो निर्णय सकारात्मक असेल.

    मागासवर्गीयांचा पदोन्नतीतील आरक्षणावर भर देऊन त्याला कसं कार्यान्वित करायचं याविषयी सगळ्यांनी चर्चा केली.मी नाराज नाही तर पदोन्नतीत आरक्षण मिळण्यासाठी कायदेशीररित्या चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले.