कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज

दिल्लीतील वातावरण देखील बदललं असून काही ठिकाणी पाऊस झाला आहे. हवामान विभागाचे अधिकारी होसाळीकर यांनी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागानं आज दिवसभरात शेतकऱ्यांना आणि इतरांना काळजी घेण्याचं आवाहन केले आहे.

    मुंबई: महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाचे अधिकारी होसाळीकर यांनी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये आज विजांच्या कडकाडासह पावसाचा इशारा दिला आहे. १२ मार्च ते १३ मार्च दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत. परंतु यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

    दुसरीकडे दिल्लीतील वातावरण देखील बदललं असून काही ठिकाणी पाऊस झाला आहे. हवामान विभागाचे अधिकारी होसाळीकर यांनी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागानं आज दिवसभरात शेतकऱ्यांना आणि इतरांना काळजी घेण्याचं आवाहन केले आहे.

    चक्रीवादळामुळं कमीदाबाचा पट्टा

    हवामान खात्याच्या माहितीनुसार पश्चिम राजस्थान, अरबी समुद्र, बंगालची खाडी या दरम्यान निर्माण झालेल्या हलक्या स्वरुपाच्या चक्रीवादळाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पूर्व विदर्भात विशेषता भंडारा जिल्ह्यात १२ मार्च ते १३ मार्च दरम्यान हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.