आजपासून पहिला विकेंड लॉकडाऊन, संध्याकाळी डाऊन झालेलं शटर थेट सोमवारी सकाळी उघडणार

राज्यात शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस राज्यातील सर्व भागात कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता राज्यातील नागरिकांसाठी हे दोन दिवस संचारबंदी असणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय इतर कारणांसाठी बाहेर पडण्यासही मनाई कऱण्यात आलीय. 

    महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊनची घोषणा काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून करण्यात आली होती. यामुळे आठवड्याचे पाच दिवस निर्बंधांसह व्यवहार सुरू राहणार तर शनिवार आणि रविवारी पूर्णतः सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळं पहिल्या विकेंड लॉकडाऊनला आता काही तासांचा अवधी उरलाय.

    राज्यात शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस राज्यातील सर्व भागात कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता राज्यातील नागरिकांसाठी हे दोन दिवस संचारबंदी असणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय इतर कारणांसाठी बाहेर पडण्यासही मनाई कऱण्यात आलीय.

    पोलीस यंत्रणाही यासाठी सज्ज झाली असून राज्यात ठिकठिकाणी विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याची तयारी पोलिसांनी केलीय. ठिकठिकाणच्या चौकात आणि रस्त्यांवर पोलीस तैताना राहणार असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. राज्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.

    नागरिकांचा एकमेकांशी होणारा संपर्क तुटावा आणि कोरोनाची चेन ब्रेक करावी, या उद्देशानं विकेंड लॉकडाऊनची घोषणा कऱण्यात आलीय. यामुळं नागरिक घरी राहतील आणि कोरोनाची चेन तुटेल, असा विश्वास सरकारला वाटत आहे. मात्र दोन दिवसांच्या लॉकडाऊननं कुठलाही फरक पडणार नसून सामान्यांचं आर्थिक कंबरडं मात्र यामुळं मोडणार असल्याची टीकादेखील होतेय.

    दरम्यान, वेगवेगळ्या परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रवास करायला या काळात परवानगी देण्यात आलीय. त्याचप्रमाणं अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी ओळखपत्र जवळ बाळगून प्रवास करू शकणार आहेत.