भय इथले संपत नाही : २६ जुलै २००५ ते २६ जुलै २०२१ महापुराचं ‘सोळावं वरिस धोक्याचं’

१६ वर्षापूर्वी महापुरामुळे मिळाल्या या धड्यातून आपण काय शिकलो याचा आढावा घेतला तर आपण काहीच बोध घेतलेला नाही हेच लक्षात येतं. कारण, राज्यातील मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रायगड या जिल्ह्यांना ज्याप्रकारे पावसाचा आणि महापुराचा अभूतपूर्व तडाखा बसला त्यानंतर संपूर्ण यंत्रणा काही प्रमाणात गोंधळून गेलेली दिसली.

    अगदी सहज बोलता बोलता कधी एखाद्याला २००५ सालच्या एखाद्या घटनेची आठवण विचारली तर सर्वजण एकच आठवण सांगतात ती म्हणजे ‘महापुरा’ची. २६ जुलै २००५ साली संपुर्ण राज्यच (Maharashtra floods of 2005) जलमय झालेलं. या महापुरामुळे राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात नाही म्हटलं तरी १०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. अनेक जण बेपत्ता झाले.

    देशाची आर्थिक राजधानी म्हणून मिरवणारी मुंबई २६ जुलै २००५ (mumbai floods 2005) रोजी निसर्गाच्या उद्रेकापुढे नामोहरम झाली. त्यामुळे राज्यातील गेल्या काही दिवसांच्या कालावधीत अनेक जिल्ह्यांना पावसाने दिलेला तडाखा आणि त्यामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व पूरस्थिती पाहता पुन्हा एकदा सक्षम आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची गरज लक्षात आली आहे.

    2005 महापुरातील मुंबई, (फोटो सौज्यन्य सोशल मीडिया)

    २६ जुलै २००५ च्या महापुरामुळे फक्त मुंबईची झालेली हानी पाहिली तर राज्याची काय अवस्था असेल याचा अंदाज येईल. ढगफुटी झाल्यामुळे मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस पडत होता. पावसाचे प्रमाण २४ तासात ९४४ मिलीमीटर इतके होते. १,०९४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर कधिही न थांबणारी मुंबई त्यादिवशी मात्र तब्बल ३० तास ठप्प झाली. याच पावसात रेल्वेच्या ५२ गाड्यांचे नुकसान झाले होते तर ३७,००० रिक्षा, ४,००० टॅक्सी, ९०० बस, १०,००० ट्रक, टेम्पोंना जलसमाधी मिळाली होती.

    2005 मुबईतील महापुर (फोटो सौज्यन सोशल मीडिया)

    १६ वर्षापूर्वी महापुरामुळे मिळाल्या या धड्यातून आपण काय शिकलो याचा आढावा घेतला तर आपण काहीच बोध घेतलेला नाही हेच लक्षात येतं. कारण, राज्यातील मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रायगड या जिल्ह्यांना ज्याप्रकारे पावसाचा आणि महापुराचा अभूतपूर्व तडाखा बसला त्यानंतर संपूर्ण यंत्रणा काही प्रमाणात गोंधळून गेलेली दिसली.

    कोकणात नेहमी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि पावसाळ्याच्या कालावधीमध्ये कोकण रेल्वे असो किंवा इतरत्र महापुराचा तडाखा बसतो आणि दरडी कोसळण्याचे प्रकारही घडतात. १९ जुलै २०२१ ते २६ जुलै २०२१ या कालावधीत मागील आठवडा भरात झालेल्या पावसामुळे फक्त कोकणात १०० हून अधिक लोकांना तर २०० जनावरांना आपला जीव गमवावा लागलाय.

    महाड तळीये दुर्घटना

    अशावेळी आतापर्यंत कोकणासाठी स्वतंत्र अशी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा का नव्हती, याचाही शोध घेण्याची गरज आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे मुख्यालय (NDRF) पुणे येथे असल्यामुळे तेथून जवानांना आणि संपूर्ण यंत्रणेला आपत्ती झालेल्या ठिकाणी जावे लागते.

    सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर येथील दरड कोसळण्याची घटना पाहिली, तर त्या घटनास्थळापर्यंत जवानांना पोहोचणे अशक्य झाले होते. कारण संपूर्ण रस्ते बंद झाले होते. हिच परिस्थिती कोकणातील चिपळूण (Chiplun) खेड (Khed) आणि रायगड (Raigad) या शहरांची झाली होती कारण चारी बाजूने कोंडी झाल्यामुळे बचाव पथक घटनास्थळी जाणार तरी कसे, हाच प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी बचावकार्य सुरू करायला काही प्रमाणात विलंब लागला हे वास्तवही स्वीकारावे लागणार आहे.

    चिपळूणमधील पुरस्थिती

    या वर्षीच्या पावसामुळे झालेल्या हानीनंतर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारण्याची घोषणा केली आणि काही निधी जाहीर केला. त्यामुळे आतातरी आगामी कालावधीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेमध्ये सुधारणा केल्या जाण्याची अपेक्षा आहे.