“मुख्यमंत्री व शिवसेना नेत्यांना सचिन वाझेची वकिली का करावी लागते?” ; भाजपा नेते नितेश राणे यांचा सवाल

नितेश राणे म्हणाले, एक साधा एपीआय जेव्हा एवढं मोठं पाऊल उचलतो आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी किंबहुना त्याची वकिली करण्यासाठी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उतरतात, शिवसेनेचे नेते उतरतात. सामनाच्या संपादकापासून अन्य नेतेमंडळी सचिन वाझे किती चांगला आहे.

    मुख्यमंत्री, शिवसेना नेत्यांना सचिन वाझेची वकिली का करावी लागते? असा थेट सवाल भाजपा नेते नितेश राणे यांनी उपस्थित केला.एपीआय सचिन वाझे प्रकरणावरून ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेत्यांवर जोरदार निशाणा साधला.

    काय म्हणाले राणे?
    नितेश राणे म्हणाले, एक साधा एपीआय जेव्हा एवढं मोठं पाऊल उचलतो आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी किंबहुना त्याची वकिली करण्यासाठी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उतरतात, शिवसेनेचे नेते उतरतात. सामनाच्या संपादकापासून अन्य नेतेमंडळी सचिन वाझे किती चांगला आहे. सचिन वाझेची कशी चूक नाही, हे जेव्हा वकिली करण्यासाठी पुढं येतात, तेव्हा त्याच्या मागची काही कारणं आहेत. नेमकं त्याचीच वकिली यांना का करावी लागते? काय आहे असं या सचिन वाझेकडे? ज्यामुळे यांना हे सगळं पणास लावावं असं वाटतं. तर त्याचे काही विषय माझ्यासमोर आहे. या विषयावर आपल्याला थेट कळेल, की नेमकं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक साधा एपीआय सचिन वाझेची वकिली नेमकी आज का करत आहेत? याबाबत काही विषय मला आपल्यासमोर मांडायचे आहेत.